कोळशावर शिजवलेले पदार्थ खाल्यास हृदय रोगाचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 10:51 AM2018-08-29T10:51:12+5:302018-08-29T10:51:38+5:30
एक नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते.
(Image Credit : commons.wikimedia.org)
अन्न शिजवण्यासाठी फार पूर्वीपासून कोळशाचा वापर केला जातो. एलपीजी गॅस ज्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलं नाहीये असे लाखो लोक आजही कोळशाचा वापर करतात. शहरांमध्ये भुट्टा आणि आणखीही काही प्रकारचे फूड्स कोशळाच्या आचेवर शिजवले जातात. पण एक नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते.
हा अभ्यास ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये केलं गेलंय. अभ्यासक डेरिक बेनेट म्हणाले की, 'आमच्या अभ्यासातून ही सूचना दिली गेली आहे की, जे लोक अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर करतात, त्यांनी वीज किंवा गॅसचा वापर करावा'.
काय आहे धोका?
अभ्यासकांनी सूचना दिली आहे की, अन्न शिजवण्यासाठी कोळसा, लाकूडसारख्या इंधनाचा वापर केल्याने वायु प्रदूषण वाढतं, सोबतच हृदयासंबंधी रोगांचा धोकाही वाढतो. अनेकांना याने अवेळी मरणही येऊ शकतं. अभ्यासासाठी २००४ ते २००८ दरम्यान चीनमधील १० परिसरातील ३, ४१, ७३० लोकांची निवड केली होती. त्यांचं वय ३० ते ७९ दरम्यानचं होतं.
वाढते हृदय रोगाची समस्या
या अभ्यासातून हे आढळलं की, फार जास्त काळ अन्न शिजवण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर केल्याने वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका वाढतो. पण याचे ठोस पुरावे नाहीये मात्र हा दावा या आधारावर करण्यात आला आहे की, कोळसा, लाकूड इंधनातून निघणाऱ्या धुराचा हृदय आणि फुफ्फुसावर प्रभाव पडतो. त्यासोबतच चपाती, मका किंवा आणखीही काही पदार्थ थेट कोळशाच्या आचेवर शिजवल्यास त्यांवर राख आणि कार्बनचे कण चिपकतात. जे आरोग्यासाठी धोकादायक असतात.