'हे' पाच पदार्थ जास्त शिजवल्याने वाढतो कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा; जाणून घ्या कोणते आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:41 PM2024-10-05T13:41:01+5:302024-10-05T13:43:02+5:30
What Food Cause Cancer: बरेच पदार्थ, फळं, भाज्या अशा आहेत ज्याने कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो, पण असेही काही पदार्थ असतात ज्यामुळे कॅन्सर होतो सुद्धा.
What Food Cause Cancer: कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते होण्याची कारणेही वेगवेगळी असतात. एका रिसर्चनुसार, वेगाने पसरणाऱ्या कॅन्सरच्या ८० ते ९० टक्के केसेस चुकीच्या सवयी आणि बाहेरील कारणांच्या असतात. यात लाइफस्टाईलशी संबंधित चुकीच्या सवयी, ज्या सुधारून तुम्ही कॅन्सरचा धोका कमी करू शकता.
अनेकांना हे माहीत नसतं की, आपला आहारही वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्यास कारणीभूत असतो. बरेच पदार्थ, फळं, भाज्या अशा आहेत ज्याने कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो, पण असेही काही पदार्थ असतात ज्यामुळे कॅन्सर होतो सुद्धा. आज आम्ही तुम्हाला ५ अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे बनवताना काही चुका केल्या तर तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
मांस
२०२० च्या एका रिपोर्टनुसार, मांस जास्त वेळ शिजवल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मांस जास्त उष्णतेवर शिजवल्याने कार्सिनोजेनिक पीएएच आणि हेटेरोसायक्लिक एमाइन (एचसीए) बनतात. हे पदार्थ कोशिकांच्या डीएनएमध्ये बदल करून कॅन्सरचे ट्यूमर बनवू शकतात.
बटाटे
बटाटे सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यांचं चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास कॅन्सर होऊ शकतो. जर तुम्ही जास्त वेळ बटाटे शिजवत असाल, जास्त वेळ तळत असाल किंवा जास्त भाजत असाल तर यातून एक्रिलामाइड केमिकल निघतं. जे एक कार्सिनोजेनिक तत्व असतं त्यामुळे बटाटे कधीही मध्यम उष्णतेवरच शिजवले पाहिजे आणि तळण्याऐवजी उकडून सेवन केलं पाहिजे.
हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्या जसे की, पालक आणि मेथीमध्ये आयर्न आणि इतर पोषक भरपूर असतात. पण या भाज्या जास्त शिजवल्या तर यातील पोषण कमी होतं आणि काही केमिकल रिअॅक्शन होतात. जास्त वेळ शिजवल्याने यातील नायट्रेट नायट्राइटमध्ये रूपांतरित होऊ शकतं, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.
धान्य
तांदूळ आणि इतर धान्य जास्त शिजवल्याने यात एक्रिलामाइड तयार होतं, ज्याचा संबंध कॅन्सरसोबत आहे. अशात तांदूळ योग्य प्रमाणात पाणी घेऊनच शिजवावे आणि जास्त वेळ शिजवू नये.
मध
मध जास्त तापमानावर गरम केल्याने ते हाइड्रॉक्सिमेथिलफुरफुरलमध्ये रूपांतरित होतं. यात कार्सिनोजेनिक असतं, जे शरीरात जीवघेण्या गाठी तयार करू शकतं. त्यामुळे मधासाठी नेहमीच कमी तापमानाचा वापर करा, जसे की, चहामध्ये टाकण्याआधी ते गरम करू नये.