Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी भरपूर कष्ट करताय? बदला जेवण बनवण्याची पद्धत, वापरा 'या' खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 03:50 PM2022-07-03T15:50:11+5:302022-07-03T15:52:40+5:30

तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा व्हावा यासाठी आज आम्ही तुम्हाला काही कुकिंग टिप्स (Cooking Tips) सांगणार आहोत आहोत. स्वयंपाक करताना या टिप्स वापरून तुम्ही वजन करू शकता.

cooking tips for fast weight loss this tips will help you to loose weight fast | Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी भरपूर कष्ट करताय? बदला जेवण बनवण्याची पद्धत, वापरा 'या' खास टिप्स

Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी भरपूर कष्ट करताय? बदला जेवण बनवण्याची पद्धत, वापरा 'या' खास टिप्स

googlenewsNext

सध्याच्या काळात वाढलेले वजन (Weight Gain) ही खूप सामान्य समस्या झाली आहे. या वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार बळावतात. त्यामुळे लोक आता जागरूक होऊन निरोगी राहण्यासाठी वजन कमी करतात. मात्र हा वजन कमी (Weight Loss) करण्याचा प्रवास सोपा नसतो. वजन कमी करण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि झोपेचे योग्य नियोजन गरजेचे असते. तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा व्हावा यासाठी आज आम्ही तुम्हाला काही कुकिंग टिप्स (Cooking Tips) सांगणार आहोत आहोत. स्वयंपाक करताना या टिप्स वापरून तुम्ही वजन करू शकता.

E Times ने दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकाची पद्धतदेखील तितकीच महत्वाची असते. योग्य प्रकारे शिजवलेले पदार्थ पोषक तत्वे टिकवून ठेवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. निरोगी स्वयंपाक तंत्र (Healthy Cooking Techniques) तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करण्यात मदत करते आणि तुम्हाला खाण्यास आवडत असलेल्या अन्नाची चवदेखील अबाधित ठेवते.

भाज्यांचे मोठे-मोठे तुकडे करा
भाज्यांचे मोठे तुकडे करा कारण ते कमी तेल शोषतात. जर तुम्हाला चरबीचे सेवन कमी करायचे असेल तर भाज्या शिजवण्यापूर्वी त्याच्यवर हलके तेल लावा (Less Oily Food) आणि मग ते शिजवा. मोठे तुकडे भाज्यांचा ओलावा आणि नैसर्गिक रंग टिकवून ठेवतील. त्यामुळे त्याचे पोषक मूल्य देखील राखले जाते.

संपूर्ण भाजी सोलू नका
जास्तीत जास्त पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी भाजीची साल पूर्णपणे काढून टाकू नका. सालीमधील फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार नाश्ता करण्याची इच्छा होत नाही. सफरचंद, बटाटे, काकडी, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या पदार्थांवर साल राहू द्या.

औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी पदार्थांना चवदार बनवा
काळी मिरी आणि वेलची यांसारख्या ताज्या मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आरोग्य फायदे असतात. हे वजा कमी करण्यासाठी मदत करतात. हे मसाले अतिरिक्त कॅलरी किंवा सोडियम न घालता जेवणाला चव देतात. ताज्या रोझमेरी, तुळस, कढीपत्त्यामुळे एक सामान्य डिश ताजी आणि स्वादिष्ट होते.

भाज्या मायक्रोवेव्हमध्ये वाफाळून घ्या
मायक्रोवेव्हिंग भाज्यांमध्ये पोषक तत्व टिकवून ठेवण्याचे फायदे आहेत आणि वेळही कमी लागतो. मायक्रोवेव्हमध्ये भाज्या वाफाळणे हे भाज्या शिजवण्याचे एक उत्कृष्ट तंत्र आहे. एका अभ्यासानुसार, मायक्रोवेव्हमध्ये वाफाळलेल्या ब्रोकोलीमध्ये, स्टीम केलेल्या किंवा उकडलेल्या भाज्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी टिकून राहते.

भाज्या तळण्याऐवजी परतून घ्या
जेव्हा कोणताही पदार्थ तळला जातो. तेव्हा जास्त प्रमाणात फॅट्स अन्नामध्ये शोषले जातात आणि भाज्यांमधील सर्व पोषक द्रव्ये जळून जातात. व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये भाज्या शिजवणे हा एक चांगला मार्ग आहे. कारण ऑलिव्ह ऑइलमध्ये स्वयंपाकाच्या तेलातील अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सची उच्च पातळी आहे.

Web Title: cooking tips for fast weight loss this tips will help you to loose weight fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.