या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी बनेल विषासारखं, होऊ शकतात गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:07 AM2023-01-30T10:07:12+5:302023-01-30T10:08:16+5:30

Copper Water : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने इम्यूनिटी, पचनक्रिया मजबूत होते. तसेच या पाण्याने वजन कमी करण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल, हाय बीपी कमी करण्यासही मदत मिळते. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा याचं सेवन तुम्ही योग्यपणे कराल.

Copper water benefits can turn into disadvantages nutritionist Kiran Kukreja told to avoid these 3 mistakes | या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी बनेल विषासारखं, होऊ शकतात गंभीर समस्या

या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी बनेल विषासारखं, होऊ शकतात गंभीर समस्या

googlenewsNext

Copper Water : तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शरीरासाठी औषधासारखं मानलं जातं. खासकरून हिवाळ्यात कारण तांबं हे उष्ण असतं. सोबतच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने इम्यूनिटी, पचनक्रिया मजबूत होते. तसेच या पाण्याने वजन कमी करण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल, हाय बीपी कमी करण्यासही मदत मिळते. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा याचं सेवन तुम्ही योग्यपणे कराल.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हाच शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही पद्धतीने त्याच वापर कराल. अशात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या 3 चूका करणं टाळलं पाहिजे. नाही तर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो.

तांब्याच्या बॉटलने दिवसभर पाणी पिणे

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की, तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल. यामुळे मळमळ होणे, चक्कर येणे, पोटदुखीसोबत लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेल्या पाण्याचं सेवन

हे सत्य आहे की, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते विषासारखं काम करतं. लिंबात आढळणारं आम्ल कॉपरसोबत मिळून शरीरात अॅसिड तयार करतं. ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो.

तांब्याची बॉटल किंवा भांड नियमितपणे धुणं

तांब्याचं भांडं नियमितपणे धुवू नये. रोज हे भांडं धुतल्याने यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात. त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्याने धुवून घ्या. आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.

Web Title: Copper water benefits can turn into disadvantages nutritionist Kiran Kukreja told to avoid these 3 mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.