अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 06:47 PM2024-07-19T18:47:42+5:302024-07-19T18:48:43+5:30

Coranavirus KP.3 Variant : अमेरिकेत कोरोनाचा FLiRT आणि आता KP.3 या नवीन व्हेरिएंटसह कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

Corana virus KP.3 Variant: kp 3 variant of corona virus symptoms know new rapidly and spreading covid 19 strain | अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक? 

अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक? 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपुष्टात आला नाही. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही अस्तित्वात असून धोकादायक होत आहे. अमेरिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट FLiRT आणि आता KP.3 या नवीन व्हेरिएंटसह कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जगातील अनेक देश याकडे एका नव्या धोक्याचा इशारा म्हणून पाहत आहेत.

बुधवारी लास वेगासच्या प्रवासादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाही कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे व्हाईट हाऊसने सांगितले. त्यांना कोरोना संसर्गाची 'सौम्य लक्षणे' जाणवत आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवीन KP.3 व्हेरिएंट अमेरिकेत वेगाने पसरत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस कोरोनाच्या रोजच्या सरासरी रुग्णांची संख्या 307 पर्यंत वाढली आहे.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या ताज्या आकडेवारीनुसार, 23 जून ते 6 जुलै दरम्यान अमेरिकेत कोरोनाची 36.9 टक्के प्रकरणे KP.3 व्हेरिएंटची होती. तर नवीन KP.3 व्हेरिएंट काय आहे आणि त्याच्या संसर्गाची लक्षणे काय आहेत? या धोकादायक व्हेरिएंटपासून कसे सुरक्षित राहू शकतो? याबाबत जाणून घ्या....

रिपोर्टनुसार, KP.3 व्हेरिएंट हा कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटसारखा आहे. यामध्ये FLiRT व्हेरिएंट  KP.1 आणि KP.2 सारखे साम्य देखील आहे. मात्र,  सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने अद्याप KP.3 व्हेरिएंटच्या वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही स्वतंत्र माहिती दिलेली नाही. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे वैद्यकीय तज्ज्ञ अधिक माहिती मिळविण्यासाठी या व्हेरिएंटवर बारकाईने निरीक्षण करत आहेत.

कोरोनाच्या नवीन KP.3 व्हेरिएंटची लक्षणे JN.1 व्हेरिएंटसारखीच आहेत. या व्हेरिएंटची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, श्वास घेण्यास अडचण, थकवा, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, चव किंवा वास कमी होणे, घसा खवखवणे, सर्दी, मळमळ किंवा उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे दिसून येतात.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने यापैकी काही गंभीर लक्षणांच्या बाबतीत आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्याचा सल्ला दिला आहे. या गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत सतत दुखणे किंवा दाब, गोंधळ, झोप न लागणे तसेच त्वचा, ओठ किंवा नखे ​​पिवळे, तपकिरी किंवा निळे पडणे यांचा समावेश होतो.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये केवळ अमेरिकेतच नाही तर इतर अनेक देशांमध्ये लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, असेही संघटनेने म्हटले आहे. तसेच, सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्यांनी कोरोनाची खबरदारी घ्यावी, लसीकरण करावे, मास्क वापरावे आणि शंका असल्यास वेळेत कोरोना चाचणी करून घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच दिलेल्या निवेदनानुसार, 27 मे ते 23 जून या कालावधीत 84 देशांमध्ये कोरोनाचा (SARS-CoV-2) पॉझिटिव्हिटी रेट 5.6 वरून 7.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनीही सांगितले की, वैद्यकीय व्यावसायिक आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चिंताजनकरित्या घसरत आहे.

Web Title: Corana virus KP.3 Variant: kp 3 variant of corona virus symptoms know new rapidly and spreading covid 19 strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.