मक्याप्रमाणेच मक्याचं पीठही आरोग्यदायी; 'या' 5 समस्यां करतं दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:43 PM2019-05-14T13:43:17+5:302019-05-14T13:45:25+5:30

पावसाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा 'भुट्टा' सध्या वर्षभरात कधीही उपलब्ध होतो. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. पण मक्याच्या पीठाचे म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

Corn flour is very beneficial for health eat corn flour and get these 5 health benefits | मक्याप्रमाणेच मक्याचं पीठही आरोग्यदायी; 'या' 5 समस्यां करतं दूर 

मक्याप्रमाणेच मक्याचं पीठही आरोग्यदायी; 'या' 5 समस्यां करतं दूर 

googlenewsNext

(Image Credit : Kidskunst.info)

पावसाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा 'भुट्टा' सध्या वर्षभरात कधीही उपलब्ध होतो. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. पण मक्याच्या पीठाचे म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक ठिकाणी तर मक्याच्या पीठापासून चपात्या तयार करण्यात येतात. अशातच पंजाबमधील मक्केकी रोटी आणि सरसों का सार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याशिवाय मक्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या पीठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. याशिवाय यामध्ये ग्लूटन असत नाही त्यामुळे याचं सेवन शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतो. जाणून घेऊया मक्याच्या पीठाचे आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या फायद्यांबाबत...

मक्याच्या पीठाचे आरोग्यदायी फायदे खालीप्रमाणे : 

डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे याचं सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते. 

एनीमियापासून बचाव 

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही. 

बद्धकोष्ट दूर करण्यासाठी 

मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात फायबर पोहोचत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तरही सामान्य राहतो. त्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर राहते. 

वजन कमी करण्यासाठी 

मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.


 
हायपरटेन्शन दूर ठेवतं 

दररोज मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळतं. ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताह उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. 

Web Title: Corn flour is very beneficial for health eat corn flour and get these 5 health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.