लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 01:26 PM2021-02-09T13:26:13+5:302021-02-09T13:27:47+5:30

Corona vaccination News & Latest Updates : . तज्ज्ञांच्या मते कोविड १९ ची लस पूर्णपणे निष्क्रीय ठरेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. व्हायरस  सहज संक्रमण पसरवू शकतो.

Corona can occur even after vaccination know who can infect you | लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या लसीकरणानंतर (vaccination)  आता अशा लोकांसाठी बातमी आहे जे अनेक महिन्यांपासून सामान्य जीवन जगण्याची वाट पाहत आहेत. कोरोनाच्या लसीकरणानंतरही अशा केसेस समोर आल्या आहेत. ज्यात लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसून आली आहे. जे लोक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीवर अवलंबून आहेत.  त्यांच्यासाठी हे धक्कादायक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते कोविड १९ ची लस पूर्णपणे निष्क्रीय ठरेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. व्हायरस  सहज संक्रमण पसरवू शकतो. पणत्यामागे अनेक कारणं आहेत. लसीकरणानंतर व्हायरसचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या  गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लसीचा प्रभाव लगेच दिसून येत नाही

रिपोर्ट्सनुसार लसीकरणानंतर व्हायरल ट्रांसमिशनचे  कोणतेही संकेत मिळालेले नाहीत ज्यातून लस कितपत प्रभावी ठरली आहे, हे कळू शकेल. लसीकरणानंतर लसीचा प्रभाव लगेच दिसून येत नाहीत. लस आजार पसरवत असलेल्या व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करते. त्यामुळे रोगप्रतिकराकशक्ती वाढते.  या प्रक्रियेसाठी काही आठवड्यांचा  कालावधी लागू शकतो. यादरम्यान जर तुम्ही सावध झाला नाहीत तर संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. 

पूर्णपणे सुरक्षित राहण्यसाठी एकपेक्षा जास्त शॉट्स घ्यावे लागणार

लसीचा डबल डोस सिंगल डोसच्या तुलनेत जास्त परिणामकारक ठरू शकतो. म्हणूनच ज्यांनी पहिला शॉट घेतला आहे त्यांनी दुसरा पण वेळेत घ्यायला हवा.  लसीचा पूर्ण परिणाम दिसून येण्यासाठी लसीचे दोन डोस घेणं महत्वाचं असतं. सावधगिरी  न बाळगल्यास संक्रमण इतर ठिकाणी पसरू शकतं. व्यक्ती कोरोना संक्रमित नसतानाही  व्हायरसचं ट्रांसमिशन होऊ शकतं.

दातांच्या पिवळेपणामुळे चारचौघात लाज वाटतेय? मग चिंता सोडा, या घरगुती उपायांनी मिळवा चमकदार दात

कोरोना लसीनं आजाराच्या गंभीरतेला खरोखरचं कमी केलं आहे. पण अजूनही प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही. लसीकरणादरम्यान अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे जी लस तुम्ही घेणार आहात ती लस व्हायरसपासून बचावासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच व्हायरसला पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. तर काही लसी या लक्षणांपासून बचाव करू शकतात पण संक्रमणापासून पूर्णपणे बचाव करू शकत नाहीत.

सावधान! जेवण बनवण्याचे तेल अन् केचअपमुळे उद्भवू शकतो लिव्हरला धोका; वेळीच जाणून घ्या साईड इफेक्ट्स

लसीकरणानंतरही आपल्याला संसर्ग होऊ शकतो. संसर्गजन्य व्हायरस शरीरात प्रवेश करताच शरीरातील एन्टीबॉडीज विकसित होण्यास सुरूवात होते. पण कोणालाही पुन्हा आजार होण्यापासून वाचवण्यासाठी हे पुरेसे नाही. अनेक लोकांना एकापेक्षा जास्त वेळा या कोरोनाची लागण झाली आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना हे माहीत असले पाहिजे की आपल्या आरोग्यास धोका निर्माण करणारे व्हायरस अजूनही अस्तित्वात आहे. आजारी पडू नये म्हणून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टेंसिंग हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: Corona can occur even after vaccination know who can infect you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.