उच्च रक्तदाबावरील औषध कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:53 AM2020-08-25T03:53:52+5:302020-08-25T08:33:14+5:30

रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढते; ब्रिटनमधील एका विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

Corona, a drug for hypertension, is effective in saving the lives of patients | उच्च रक्तदाबावरील औषध कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गुणकारी

उच्च रक्तदाबावरील औषध कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गुणकारी

Next

नवी दिल्ली : उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी वापरले जाणारे औषध कोविड-१९ रुग्णांसाठी प्रभावी ठरत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. या औषधामुळे कोविड-१९ रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढते तसेच संसर्गाची तीव्रता कमी होते, असे या अभ्यासात आढळून आले आहे.

ब्रिटनमधील इस्ट अँग्लिया विद्यापीठाने २८ हजार रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. उच्च रक्तदाबावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘अँटिहायपरटेन्सिव्हज्’ औषधांचा परिणाम यात तपासण्यात आला. ‘करंट अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस रिपोर्ट्स’ या नियतकालिकात या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

कोरोना झालेले जे रुग्ण उच्च रक्तदाबावरील ‘अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर्स (एसीईआय) अथवा अँजिओटेन्सिन सिसिप्टर ब्लॉकर्स (एआरबी)’ ही औषधी घेत होते त्यांच्यातील मृत्यूचा दर कमी असल्याचे अभ्यासात आढळून आले. इस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या नॉर्विच मेडिकल स्कूलचे प्रमुख संशोधक वॅसिलिओस वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कोविड-१९ संसर्गाचा गंभीर धोका असल्याचे आपण जाणतोच.

साथीच्या सुरुवातीच्या काळात उच्च रक्तदाबावरील विशिष्ट औषधींच्या गंभीर परिणामाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यावर काही संस्थांनी अभ्यासही केला होता. कोविड-१९ आणि एसीईआय व एआरबी यांच्याशी संबंधित १९ अभ्यासांचे विश्लेषण इस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केले. जे कोविड-१९ रुग्ण एसीईआय आणि एआरबी औषधी घेत होते तसेच जे रुग्ण ही औषधी घेत नव्हते, यांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. प्रकृती गंभीर असण्याचे प्रमाण तसेच मृत्यू या मुद्यांवर प्रामुख्याने हा अभ्यास करण्यात आला.

ही औषधी प्रारंभी मानली जात होती धोकादायक

  • वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, या औषधांनी कोविड-१९ चे गांभीर्य वाढते अथवा त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो, हे जे सुरुवातीला मानले जात होते, तसे आम्हाला काहीही आढळून आले नाही.
  • उलट ही औषधी घेणाºया रुग्णांत गंभीर अवस्थेत जाण्याचे तसेच त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण आम्हाला कमी आढळून आले. ही औषधी धोकादायक ठरण्याऐवजी उपकारक ठरल्याचे अभ्यासात दिसून आले.
  • एसीईआय/एआरबी घेणाºया कोविड-१९ रुग्णांत प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण ही औषधी न घेणाऱ्यांच्या तुलनेत 0.६७ पट कमी आढळून आले. वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबावरील ही औषधी घेणाºयांना कोविड-१९ ची लागण झाल्यास ही औषधी सुरूच ठेवण्यात यावी, अशी शिफारस आम्ही अभ्यासांती करीत आहोत. आम्ही ही शिफारस पुराव्यांसह करीत आहोत.
  • गंभीर रुग्णांना ही औषधी देणे सुरू करावे का, या प्रश्नावर मात्र आम्ही कोणतीही शिफारस करीत नाही. कारण हा विषय पूर्णत: निराळा आहे. आमचा अभ्यास आधीच सुरू असलेल्या औषधापुरता मर्यादित आहे.

Web Title: Corona, a drug for hypertension, is effective in saving the lives of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.