Omicron Symptoms: ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये सर्वात आधी दिसतं ‘हे’ लक्षण; लसीकरण झालेल्यांनीही सतर्क राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:08 PM2022-01-10T14:08:19+5:302022-01-10T14:08:46+5:30

ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे त्यांच्यासाठी सामान्य सर्दी-तापासारखं हे दिसून येते. दोन दिवसानंतर पुन्हा तुम्ही रेग्युलर रुटीन सुरु करु शकता.

Corona: Is the first symptom to appear in Omicron infected patients; Beware also vaccinated people | Omicron Symptoms: ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये सर्वात आधी दिसतं ‘हे’ लक्षण; लसीकरण झालेल्यांनीही सतर्क राहा

Omicron Symptoms: ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये सर्वात आधी दिसतं ‘हे’ लक्षण; लसीकरण झालेल्यांनीही सतर्क राहा

Next

नवी दिल्ली – ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेने सौम्य असला तरी दोघांमधील लक्षणांमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे डॉक्टर ओमायक्रॉनच्या लक्षणं योग्यरित्या ओळखावी जेणेकरुन याचा प्रसार होण्यापासून रोखलं जाईल असं वारंवार सांगत आहेत. अमेरिकेच्या येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील सहाय्यक प्राध्यापक जॉर्ज मोरेनो यांनी ओमायक्रॉन संबंधित लक्षणांचा खुलासा केला आहे.

ओमायक्रॉनची विशेष लक्षणं – प्राध्यापक जॉर्ज मोरेनो यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येक दिवशी कोरोनाचे १०-१५ रुग्ण आढळून यायचे परंतु मागील आठवड्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कारण ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्यापासून कोविड रुग्णसंख्येत वाढ  झाली आहे. Covid 19 च्या अन्य लक्षणांप्रमाणे सुरुवातीला रुग्णाला कडवेपणा आणि घशात खवखवणे जाणवायची. त्यामुळे जेवतानाही त्रास व्हायचा हे एक प्रमुख लक्षण आहे.

नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, आणि यूकेच्या डॉक्टरांनी अशाप्रकारे घशात खवखवणे ओमायक्रॉनच्या विशेष लक्षणांत समाविष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील डिस्कवरी हेल्थ सीईओ रेयान नोचने सांगितल्याप्रमाणे, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये विशेषत: घशात खवखवण्याच्या तक्रारी येत आहे. त्यानंतर नाक बंद होणे, सुखा खोकला, अंगदुखी ही लक्षणं आहेत. तर घशात खवखवणे नेहमी साइनस कंजेशन आणि डोकेदुखीनंतर होते असं प्राध्यापक मोरेनो यांनी म्हटलं.

स्टडी रिपोर्ट काय म्हणतो?

Zoe कोविड लक्षणांच्या स्टडीनुसार, ओमायक्रॉनच्या सर्व रुग्णांमध्ये सुरुवातीला घशात खवखवणे ही सर्वसामान्य लक्षणं दिसून येते. नॉर्वेच्या एका स्टडीत क्रिसमस पार्टीत सहभागी झालेल्या ७२ टक्के संक्रमित लोकांच्या घशात खवखव सुरु होती. सलग ३ दिवस हा प्रकार सुरु होता. सर्वाधिक संक्रमित लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. प्रा. मोरेनो यांनी सांगितले की, माझ्या दवाखान्यात येणारे सर्वाधिक रुग्ण लसीकरण झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात ही लक्षणं आहेत ती सौम्य आणि काही दिवसांपर्यंत राहणारी आहे. ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे त्यांच्यासाठी सामान्य सर्दी-तापासारखं हे दिसून येते. दोन दिवसानंतर पुन्हा तुम्ही रेग्युलर रुटीन सुरु करु शकता.

लसीकरण झालेल्यांना सर्वात आधी दिसतात हे लक्षण

तज्ज्ञांच्या नुसार, डेल्टा इंफेक्शनमध्ये लसीकरण झालेल्या लोकांना घशात खवखवणे या तक्रारी होत्या. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये हे सर्वात जास्त जाणवतं. जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वायरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन लक्षणांमध्ये एक वेगळे लक्षण आढळून येते जे इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळे आहे. यात डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे गंध आणि चव जात नाही. केवळ घसा खवखवणे, नाकापर्यंत पोहचण्याआधी गळ्यात खवखवणे सुरु असते.   

Web Title: Corona: Is the first symptom to appear in Omicron infected patients; Beware also vaccinated people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.