CoronaVirus : आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र; जाणून घ्या खासियत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:40 PM2020-06-12T12:40:21+5:302020-06-12T12:56:00+5:30

CoronaVirus Latest News : “स्मार्ट गार्ड फॉर कोविड-19 नावाचं हे यंत्र कोरोनाबाधीत रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

Corona infected patient will be monitored by the device developed ashoka institute varanasi | CoronaVirus : आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र; जाणून घ्या खासियत 

CoronaVirus : आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र; जाणून घ्या खासियत 

Next

कोरोना व्हायरसच्या माहामारीत संक्रमण झालेल्या लोकांकडे लक्ष ठेवणं खूपच कठीण झालं आहे. कारण  दिवसेंदिवस संक्रमणाचा आकडा वाढत आहे. त्यासाठी अनेक अॅप्स सुद्धा तयार करण्यात आले होते. वाराणसीतील अशोका इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केलं आहे. अशोका इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळासाठी हे यंत्र तयार केलं आहे. या यंत्राने  कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली घरं, रुग्णालयं किंवा क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आलेल्या लोकांची माहिती  पोलिसांना गजर  वाजल्यामुळे मिळू शकेल.  

स्मार्ट गार्ड फॉर कोविड-19 नावाच्या या यंत्राच्या माध्यामातून रुग्णालयात भरती असलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येऊ शकतं. रिसर्च एंड डेवलपमेंट डिपार्टमेंटचे श्याम चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पांडे, निखिल केसरी आणि मोहम्मद सैफ यांनी हे यंत्र तयार केले आहे.  डिपार्टमेंटचे प्रमुख श्याम चौरसिया यांनी सांगितले की, “स्मार्ट गार्ड फॉर कोविड-19 नावाचं हे यंत्र कोरोनाबाधीत रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

संक्रमित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा संक्रमण पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या यंत्राने रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत होईल. यामुळे रुग्ण  घराबाहेर कितीवेळा निघाला आहे याबाबत माहिती मिळू शकेल.  रुग्णांच्या हालचालींवरून सेंन्सर कार्यान्वित होईल त्यानंतर पोलीसांपर्यंत रुग्णाचे लोकेशन पोहोचवले जाईल. या यंत्राला रुग्णालयाजवळ किंवा घराजवळ लावण्यात येणार आहे. या सेंन्सरची रेंज ५ चे १० मीटरपर्यंत असेल. 

 पुढे त्यांनी सांगितले की, या यंत्रांची खासियत म्हणजे जर एखादा रुग्ण सुचना न देता घराबाहेर पडत असेल तर या यंत्राच्या माध्यमातून माहिती मिळवता येऊ शकते. हे यंत्र तयार करण्यासाठी जास्त खर्च लागणार नाही. तसंच कमी वेळेत तयार होणारं हे यंत्र आहे. या यंत्रामध्ये सेंसर ५ वोल्ट बॅटरी, ९ वोल्ट कीपॅड मोबाइल सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करण्यात आला आहे.  याशिवाय हे यंत्र तयार करण्यासाठी ८ हजार ५०० रुपयांचा खर्च आला. कोरोना काळात रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी हे यंत्र परिणामकारक ठरू शकतं. 

मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार 

लक्षणं दिसताच चाचणी केल्यास रिपोर्ट येऊ शकतो निगेटिव्ह; योग्य रिपोर्टसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Web Title: Corona infected patient will be monitored by the device developed ashoka institute varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.