Corona & cancer: कोरोना किरकोळ, खरे संकट कॅन्सरचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:19 AM2022-02-03T06:19:35+5:302022-02-03T06:20:58+5:30
Corona & cancer: औषधांच्या एकूण बाजारपेठेतील कोरोना लसीचा वाटा किती आहे? - फक्त ७.३% एवढा! मात्र त्या तुलनेत २०२१ या वर्षात कॅन्सरवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा एकूण महसुली वाटा होता तब्बल १८%.
२०२१ या वर्षात जागतिक औषध निर्मात्या कंपन्यांची चंगळ झाली. या कंपन्यांनी लसविक्रीतून कमावलेल्या महसुलात या एका वर्षात तब्बल १४२% एवढी अतिप्रचंड वाढ झाली; हे खरे आहे तरी औषधांच्या एकूण बाजारपेठेतील कोरोना लसीचा वाटा किती आहे? - फक्त ७.३% एवढा! मात्र त्या तुलनेत २०२१ या वर्षात कॅन्सरवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा एकूण महसुली वाटा होता तब्बल १८%. जगभरातील कॅन्सरवरील औषधांची बाजारपेठ दरवर्षी वाढतच जाईल, असा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. २०२५ पर्यंत औषधांच्या जागतिक महसुलात कॅन्सरच्या औषधांचा वाटा तब्बल २२ टक्क्यांवर जाईल आणि या विक्रीतून औषध निर्मात्या कंपन्या सुमारे २८२ बिलियन डॉलर्सचा महसूल कमावतील.