जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:16 PM2022-05-11T16:16:15+5:302022-05-11T16:17:44+5:30

corona : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, यासोबत कोरोना टेस्टिंगमध्ये कमतरता दिसून येत आहे.

corona outbreak testing down by 70 to 90 percent in world experts raise alarm | जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल"

जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल"

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान कोरोना टेस्टिंग घटल्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. जगभरात कोरोना टेस्टिंग ७० ते ९० टक्के कमी झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कोरोना 'सायलंट किलर' होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटते. 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, यासोबत कोरोना टेस्टिंगमध्ये कमतरता दिसून येत आहे. ही शास्त्रज्ञांसाठी चिंता वाढवण्याची बाब आहे. दरम्यान, जर टेस्टिंग कमी झाली तर कोरोना महामारीची सध्याची स्थिती काय आहे, हे शास्त्रज्ञ ट्रॅक करू शकणार नाहीत. तसेच, कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट, नवीन व्हेरिएंट आणि म्युटेंटची माहिती सुद्धा गोळ्या करता येणार नाही.  

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत कोरोना टेस्टिंग ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर टेस्टिंगमध्ये वाढ करायला हवी होती, मात्र याच्या उलट झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, आपल्याला जेवढी टेस्टिंग करायची होती, त्याच्या आसपास सुद्धा आपण केली नाही आहोत, असे डॉक्टर कृष्णा उदय कुमार म्हणाले. दरम्यान, कृष्णा उदय कुमार हे ड्युक युनिव्हर्सिटीमध्ये ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरचे संचालक आहेत. दुसरीकडे, अमेरिकेत आढळणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी १३ टक्के प्रकरणे नोंदवली जात आहेत, असे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अनेक देशांमध्ये कोरोना टेस्टिंग बंद करण्यात आली आहे, कारण त्या देशांमध्ये कोरोना उपचारांवरील औषधांची कमतरता आहे. तसेच, घरांमध्ये होणाऱ्या टेस्टिंग सुद्धा शास्त्रज्ञांच्या निशाण्यावर आहेत, कारण ट्रॅकिंग सिस्टिममध्ये त्यासंदर्भात कोणताच रेकॉर्ड नाही. यामुळे अशा लोकांची स्थिती दृष्टीहीन व्यक्तीसारखी झाली आहे आणि त्यांना व्हायरससोबत नवीन काय होत आहे, हे समजत नाही, असे शास्त्रांचे म्हणणे आहे.

Web Title: corona outbreak testing down by 70 to 90 percent in world experts raise alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.