ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:22 PM2022-03-16T13:22:35+5:302022-03-16T13:23:35+5:30

Stealth Omicron : सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

corona stealth variant of omicron surge in world should india be worried too know the details | ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

googlenewsNext

नवी दिल्ली : तीन वर्षांनंतरही जग कोरोनामुळे (corona) भयभीत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होताच पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा कोरोनाने कहर दाखवायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट (New variant of Omicron), ज्याला स्टील्थ किंवा BA.2 व्हेरिएंट (BA.2 variant) देखील म्हटले जात आहे, हा सध्या जगभरात वेगाने पसरत आहे.

सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतात कोरोनाची बरीच नवीन प्रकरणे समोर आली आहेत, परंतु हे वादळापूर्वीच्या शांततेसारखे आहे, असे काही लोकांना वाटत आहे.

BA.2 हा ओमायक्रॉनचा पाचवा व्हेरिएंट आहे, जो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळला होता. दरम्यान,  BA.2 व्हेरिएंट केवळ चीनमध्येच थांबणार नाही, तर इतर देशांमध्येही त्याचा प्रसार होईल, असे  जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) म्हणणे आहे. तर स्टील्थ व्हेरिएंटमुळे भारतात फारसा त्रास होणार नाही, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोव्हिड-19 टास्क ग्रुपचे (Covid-19 task group) प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोरा (Dr Narendra Kumar Arora) यांनी इंडिया टुडेला सांगितले की, भारतात BA.2 व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी सांगितले की, भारतात तिसऱ्या लाटेदरम्यान, कोरोनामुळे BA.2 बाधित लोकांची संख्या 75 टक्क्यांहून अधिक होती. यामुळेच आयआयटी कानपूरच्या अभ्यासात 22 जूनपर्यंत चौथी लाट येण्याची भीती वर्तविली होती. ती योग्य नाही आहे.

'झाडाच्या फांद्यांसारखाच नवीन व्हेरिएंट'
आयएमए-कोचीच्या संशोधन कक्षाचे (Research Cell of the IMA-Kochi) प्रमुख डॉ. राजीव जयदेवन  Dr Rajeev Jayadevan) यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट अगदी झाडाच्या फांद्यांसारखाच आहे. ज्याप्रमाणे झाडाच्या नवीन फांद्या बाहेर पडत राहतात, त्याचप्रमाणे कोरोनाचेही नवीन रूप येत राहतील. ते म्हणाले की, हा व्हेरिएंट चीनमध्ये अधिक पसरत आहे कारण वृद्धांमध्ये कमी लसीकरण झाले आहे. चुकीच्या माहितीमुळे चीनमधील वृद्धांनी लसीकरण केलेले नाही.

Web Title: corona stealth variant of omicron surge in world should india be worried too know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.