Corona Symtoms : कोरोनाचं नवं लक्षण असू शकतो छातीत जाणवणारा त्रास; कसा ओळखाल शरीरात झालेला बदल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:15 AM2021-05-09T10:15:01+5:302021-05-09T11:20:00+5:30

Corona Symptoms : कोविड -१९ च्या लक्षणांमध्ये त्याचा उल्लेख झालेला नसला तरी आता काही संकेतांच्या आधारे हे कोविडचे लक्षण म्हणूनही पाहिले जात आहे.

Corona Symptoms : Chest problem can also be a sign of corona infection | Corona Symtoms : कोरोनाचं नवं लक्षण असू शकतो छातीत जाणवणारा त्रास; कसा ओळखाल शरीरात झालेला बदल?

Corona Symtoms : कोरोनाचं नवं लक्षण असू शकतो छातीत जाणवणारा त्रास; कसा ओळखाल शरीरात झालेला बदल?

googlenewsNext

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दररोज वाढत आहेत. विषाणूच्या परिवर्तनामुळे होणार्‍या प्रकरणांसह, नवीन लक्षणांची यादी देखील वाढत आहे. संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेतील लक्षणांची तीव्रता देखील पहिल्यापेक्षा वेगळी आहे, म्हणूनच आता संसर्ग झाल्याच्या काही दिवसातच रुग्णांची परिस्थिती गंभीर बनत आहे. अलीकडेच तज्ञांनी कोरोनाची काही नवीन लक्षणे ओळखली आहेत. तज्ञ छातीत दुखणं हे कोरोनाचे एक लक्षण म्हणूनही विचारात घेत आहेत. आजवर कोविड -१९ च्या लक्षणांमध्ये त्याचा उल्लेख झालेला नसला तरी आता काही संकेतांच्या आधारे हे कोविडचे लक्षण म्हणूनही पाहिले जात आहे.

अलिकडील संशोधनात, तज्ञांना असे आढळले आहे की कोविडची दोन्ही सौम्य आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना छातीत दुखण्याचे लक्षण दिसले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड इन्फेक्टीव्हजमध्ये विविध कारणांमुळे छातीत समस्या आढळू शकतात.

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण झाल्यानंतर लोकांना छातीत दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे छातीत दुखणे हे श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे उद्भवू शकते. छातीत दुखण्याबरोबरच, कोविडची इतर लक्षणे देखील असू शकतात जसे ताप, खोकला आणि चव किंवा वास समस्या. कोविड संक्रमित लोक छातीत दुखत असल्यास, नमूद केलेल्या लक्षणांकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

सुका खोकला

कोरोना विषाणूच्या जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये सुका खोकला हा सर्वात सामान्य लक्षण मानला जातो. खोकल्याच्या तीव्रतेमुळे काही लोकांना छातीत वेदना देखील होऊ शकते. खूप वेगवान आणि तीव्र खोकला श्वासोच्छवासाची समस्या वाढवू शकते यामुळे छातीच्या सभोवतालचे स्नायू फुटणे अशा समस्या उद्भवू शकतात.  अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

कोविड निमोनिया

कोविडच्या नवीन लक्षणांमध्ये लोक न्यूमोनियाने देखील पीडित आहेत, अशा परिस्थितीत रुग्णाला अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. फुफ्फुसांच्या आतल्या हवेच्या पिशवीमध्ये जळजळ झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. यामुळे छातीत द्रव तयार होतो ज्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. या स्थितीत, लोकांना रात्री छातीत दुखण्याची समस्या जास्त असते.

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

फुफ्फुसांचे संक्रमण

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, फुफ्फुसातील संसर्गाचे प्रमाण जास्त दिसून येते. जर फुफ्फुसात थोडी सूज येत असेल तर रुग्णाला छातीत अस्वस्थता आणि वेदनांच्या समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत, फुफ्फुसांची स्थिती जाणून घेण्यासाठी छातीचा एक्स-रे किंवा सीटी-स्कॅन करणे चांगले ठरते.
 

Web Title: Corona Symptoms : Chest problem can also be a sign of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.