तुमच्या चिमुकल्यांमधील कोरोनाची लक्षणं वेळीच ओळखा! तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:36 PM2022-01-12T13:36:07+5:302022-01-12T13:40:02+5:30

तज्ज्ञांनी काही लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांची माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्हाला कळू शकतं की, मुलांना संसर्गाचा धोका कधी असू शकतो.

corona symptoms in children told by experts | तुमच्या चिमुकल्यांमधील कोरोनाची लक्षणं वेळीच ओळखा! तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या अधिक

तुमच्या चिमुकल्यांमधील कोरोनाची लक्षणं वेळीच ओळखा! तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या अधिक

Next

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची तिसरी लाट आली असून या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलीयेत. अशा परिस्थितीत प्रत्येक पालकांच्या मनात आपल्या मुलांचं कोरोनापासून कसं रक्षण करायचं हा प्रश्न मनात आहे. यावेळी पालकांनीही मुलांकडे नीट लक्ष देऊन त्याच्यांत जराही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एका अहवालानुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग सौम्य लक्षणांपासून सुरू होतो. सुरुवातीला जर याची दखल घेतली नाही तर ते गंभीर होऊ शकते. यामध्ये तज्ज्ञांनी काही लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांची माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्हाला कळू शकतं की, मुलांना संसर्गाचा धोका कधी असू शकतो.

लहान मुलांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणं

  • ताप
  • खोकला
  • श्वसनाच्या समस्या
  • घसा खवखवणं
  • नाक वाहणं
  • थंडी वाजणं
  • डोकेदुखी
  • 8 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये वास घेण्याची क्षमता कमी होणं
  • उलट्या
  • जुलाब
  • थकवा

नोएडाच्या मदरहूड रूग्णालयातील सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट डॉ. निशांत बन्सल यांनी सांगितलं की, काही मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सूज येऊ शकते. तर काही प्रकरणांमध्ये, ही सूज अनेक आठवडाभर टिकू शकते. ही चिंतेची बाब आहे. मुलांमध्ये, या स्थितीला मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणतात. या लक्षणांचा कोरोनाशी कसा संबंध आहे यावर सध्या संशोधन सुरू आहे.

मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं

  • ताप
  • मानदुखी
  • उलट्या किंवा अतिसार
  • डोळे लाल होणं
  • खूप थकवा
  • लाल ओठ
  • हात-पाय सुजणं
  • घसा खवखवणं
  • पोटदुखी

Web Title: corona symptoms in children told by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.