Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 09:46 AM2021-04-11T09:46:48+5:302021-04-11T09:52:46+5:30

Corona Symptoms : आरोग्य तंज्ज्ञांच्यामते कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ला चढवत आहे. नवीन स्ट्रेन खूप जास्त संक्रामक असल्यामुळे फुफ्फुसं आणि श्वसन तंत्रात सहज पसरत आहे.

Corona Symptoms : Corona virus new strain symptoms how fever and cough are differnt in second wave | Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं

Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं

Next

(Image Credit- Getty image, aajtak)

भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या रोज एक लाखांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. खोकला, ताप, वास न  येणं, चव न समजणं, ही कोरोना व्हायरसची काही सामान्य लक्षण आहे. पण आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं धुमाकुळ घातला आहे.  कोरोनाच्या या स्ट्रेनची लक्षणं जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत कशी वेगळी आहेत तसंच या लक्षणांना  कसं ओळखायचं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

डोळे लाल होणं

चीनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून आलं की  कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर रुग्णाचे डोळे लाल किंवा गुलाबी दिसत आहेत. याशिवाय सुज, डोळ्यातून पाणी येणं या समस्यांचा ही सामना करावा लागत आहे.

कानांची समस्या

इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडिओलॉजीमध्येय प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमित रुग्णांना कानाशी संबंधित संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असतील तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं  लक्षण असू शकतं. अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 

पोटाच्या समस्या

नवीन स्ट्रेनमध्ये संशोधकांनी गॅस्ट्रोइंटेन्साईनल लक्षणं जाणवत असल्याचं सांगितले आहे.  सुरूवातीला रुग्णाला अपर रेस्पिरेटरी सिस्टिमची समस्या जाणवत होती. आता पोटाशी निगडीत समस्या समोर येत आहेत. नवीन स्ट्रेनमध्ये लोकांना उल्टी, पोटदुखीसह पचनाच्या इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

ब्रेन फॉग

कोरोनाच्या नवीन स्ट्रेननं संक्रमित लोकांमध्ये न्यूरोजॉलिकल डिसॉर्डरची समस्याही पाहायला मिळत आहे. medRxiv च्या रिपोर्टनुसार  दीर्घकाळ कोरोना संक्रमणाचा सामना करत असलेल्यांना ब्रेन फॉग किंवा मेंटल कंफ्यूजनचा सामना करावा लागू शकतो. 

हार्ट बीट

जर तुम्हाला अनेक दिवसांपासून असामान्य हार्ट बीट जाणवत असतील तर  दुर्लक्ष करणं महागात पडू  शकतं. मायो क्लिनिकनं दिलेल्या माहितीनुसार नवीन स्ट्रेनच्या जाळ्यात  अडकल्यानंतर हृदयाचे ठोके वेगानं पडू लागतात. जामा जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार जवळवास ७८ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.  तर ६० टक्के लोकांना मेयोकार्डिएल इंफ्लेमेशनचा सामना करावा लागत आहे. 

नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डोकेदुखी

आरोग्य तंज्ज्ञांच्यामते कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ला चढवत आहे. नवीन स्ट्रेन खूप जास्त संक्रामक असल्यामुळे फुफ्फुसं आणि श्वसन तंत्रात सहज पसरत आहे. त्यामळे निमोनिया होऊन कोरोनाला अधिक घातक बनवत आहे. अशावेळी तीव्रतेनं डोकेदुखी जाणवू शकते. कोरोनाच्या आधीच्या स्ट्रेनचे संक्रमण झाल्यानंतर सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं,  चव, वास न समजणं, शिंका येणं, घसा खवखवणं,  हातापायांना सूज येणं ही लक्षणं जाणवत होती. 

Web Title: Corona Symptoms : Corona virus new strain symptoms how fever and cough are differnt in second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.