Corona Vaccination : धक्कादायक! कोरोना लसीचे २ डोस घेतल्यानंतरही जिल्हाधिकारी 'कोरोना पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:37 PM2021-03-12T12:37:33+5:302021-03-12T12:41:33+5:30
Corona Vaccination: जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे, करोना लसीकरण मोहिमेवर नव्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जानेवारीपासून देशभरात कोरोनाची लसीकरण (CoronaVaccine) मोहिम सुरू करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये दिलासादायक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं. पण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लोकांमध्ये भीती वाढत आहे. अशाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे, करोना लसीकरण मोहिमेवर नव्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Got COVID positive today. Please do COVID test yourself who came in contact with me
— Yashwant Kumar IAS (@Yashias) March 11, 2021
छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरुवारी करोना संक्रमित आढळले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच ट्विट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. तसंच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनाही करोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. आयएएस अधिकारी असलेल्या यशवंत कुमार यांनी करोना लसीकरण मोहिमेत सहभागी होत लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, दुसरा डोस घेतल्यानंतर तीन दिवसांनी करोना चाचणीत ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं तरिही यशवंत कुमार यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.
यशवंत कुमार यांनी करोना लसीचा पहिला डोस ८ फेब्रुवारीला घेतला होता. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर तीन दिवसांनी गुरुवारी त्यांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये ते करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या यशवंत कुमार यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सावधान! कोरोना झाल्यानंतर 'ही' गोष्ट केल्यास वाढतोय मृत्यूचा धोका; संशोधनातून समोर आलं कारण
दरम्यान कोरोना लस घेताना जिल्हाधिकारी यशवंत कुमार यांनी लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला होता. तसंच नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन करताना ते दिसले होते. आता मात्र यशवंत कुमार हेच करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना लसीकरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरंच लसीकरणाने कोरोनापासून बचाव होईल का? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...