Corona Vaccine: बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल? २० टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, क्लिनिकल चाचणीत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:17 PM2021-09-12T17:17:08+5:302021-09-12T17:27:09+5:30
कोरोना लसीकरणानंतरही २० टक्के लोकांच्या शरीरात कोविड १९ विरोधात अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत.
नवी दिल्ली – कोरोना लसीकरण केल्यानंतरही काही लोकांमध्ये अँन्टीबॉडी पातळी कमी असल्याचं आढळून येत आहेत. लसीकरण मानवी शरीरात अँन्टीबॉडी क्षमता वाढवण्याचं काम करते. परंतु लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी होत असल्याचं दिसलं. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लसीकरणानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी राहतेय त्या लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासेल असं रिसर्चच्या हवाल्याने एका तज्ज्ञाने सांगितले आहे.
कोरोना लसीकरणानंतरही २० टक्के लोकांच्या शरीरात कोविड १९ विरोधात अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भुवनेश्वरच्या रिसर्च युनिटच्या २३ टक्के स्वयंसेवकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले होते. परंतु त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडी पातळी आधीसारखीच राहिली. भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सचे संचालक डॉ. अजय परिदा यांनी शिफारस दिली आहे की, कमी अँन्टीबॉडी असलेल्या लोकांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. काही कोविड संक्रमित लोकांमध्ये अँन्टीबॉडीची पातळी ३० ते ४० हजारावर आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्या ५० च्या खाली आहे. जर अँन्टीबॉडी पातळी ६० ते १०० असती तर ती अँन्टीबॉडी पॉझिटिव्ह असल्याचं मानलं जातं.
लसीच्या दोन्ही डोसनंतरही बूस्टर डोसची गरज
भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट इंडियन SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियमचा एक भाग आहे. देशभरातील २८ प्रयोगशाळांचं एक नेटवर्क आहे. कोरोना व्हायरसच्या निर्माण होणाऱ्या व्हेरिएंटमधील जीनोम सीक्वेंस करण्यास सक्षम आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत त्यातील अनेक लोकांची अँन्टीबॉडी पातळी चार ते सहा महिन्यानंतर कमी होताना आढळली. लसीचे दोन्ही डोस घेऊनही ज्याची निगेटिव्ह अँन्टीबॉडी असेल त्यांना बूस्टर डोसची(Booster Dose) गरज भासणार आहे.
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन ७०-८० टक्के प्रभावी
डॉ. अजय परिदा म्हणाजे की, क्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आहे. भारतातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा प्रभाव ७०-८० टक्केच आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २०-३० टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी विकसित होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) बूस्टर डोसवर सध्या स्थगिती दिली आहे. परंतु बूस्टर डोसची शिफारस लवकरच मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी देशात ७३.७३ कोटीपेक्षा जास्त कोविड लसीचे डोस देण्यात आले अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.