Corona Vaccine: दरवर्षी घ्यावी लागणार कोविड १९ ची लस? आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट शब्दात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:53 PM2021-09-09T17:53:51+5:302021-09-09T17:57:07+5:30
कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागते. तर कोव्हॅक्सिनसाठी ४-६ आठवड्यांचे अंतर आहे.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लसीचे दोन्ही डोस घेतले तरी बहुतांश लोकांच्या मनात प्रश्न आहे की, दरवर्षी लस घ्यावी लागेल का? कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर आल्यानंतर वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी ठरणार याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. परंतु सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
अनेक तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, कोविड लसीपासून मिळणारी रोग प्रतिकार शक्ती ठराविक कालावधीनंतर संपुष्टात येते. याच कारणानं कोविड लसीकरणानंतर बूस्टर्स डोस घेण्यावरुन चर्चा सुरु आहे. तर काही लोकांना हे पण जाणून घ्यायचंय की, जर लसीची इम्युनिटी वेळेसोबत संपली तर त्यांना दरवर्षी कोविड शॉट घ्यावा लागेल का? भारतात भारत बायोटेकची Covaxin, सीरम इन्स्टिट्यूटची Covishield आणि रशियाची Sputnik V लस आता देशातील लोकांना दिली जात आहे.
या सर्व कोरोना लसीचे दोन डोस दिले जातात. कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागते. तर कोव्हॅक्सिनसाठी ४-६ आठवड्यांचे अंतर आहे. रिपोर्टनुसार, रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे दोन्ही डोस २१ दिवसांच्या अंतराने घेतले जाऊ शकतात. परंतु भारत आणि परदेशात लसीचे बूस्टर डोस विकसित करण्यावर काम सुरू आहे. इस्त्राइल, अमेरिकासारख्या देशात लोकांना लसीचे तिसरे डोसही द्यायला सुरुवात केली आहे.
लसीपासून मिळणारी रोग प्रतिकार शक्ती काही दिवसांपुरती मर्यादित?
अलीकडेच काही प्रकरणात समोर आले आहे की, लस घेतल्यानंतरही अनेकजण कोरोना संक्रमित आढळत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. वेळेनुसार लसीपासून मिळणारी अँन्टिबॉडी(Corona Vaccination) कमी होत असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे बूस्टर डोस रेग्युलर बेसिसवर घ्यावे लागतील? असा प्रश्न लोकांच्या मनात कायम आहे.
दरवर्षी घ्यावी लागणार कोरोना लस?
कोविड लसीपासून मिळणारी इम्युनिटीबाबत शंका आहे. इम्युनिटी सिस्टमला वारंवार बूस्ट करण्याची आवश्यकता भासू शकते असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, क्लिनिकल ट्रायल्स आणि फाइंडिग्स पाहता लस ८ महिने ते १ वर्षापर्यंत अँन्टिबॉडी शरीरात उत्पादीत करते. त्यामुळे काही महिन्यांनी बूस्टर शॉटची गरज भासेल ज्यामुळे इम्युनिटी कायम टीकेल. कदाचित काळांतराने लोकांमध्ये हार्ड इम्युनिटी तयार होतील त्यानंतर लसीची गरज भासणार नाही असंही होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितले.
तसेच बूस्टर शेड्युलवर आत्ताच काही सांगणं कठीण आहे. परंतु वेळेनुसार आपल्याला लसीचे बुस्टरची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचे विविध नवीन व्हेरिएंट आणि संक्रमित डेटा समोर येतील त्यावर हे सगळं निर्भर असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले. कोविड लस बूस्टर्स, कोविड १९ लसीचा एक्सटेंशन आहे. याला तिसऱ्या कोविड लसीच्या डोसप्रमाणेच मानलं जाईल. केवळ यात टाइम ड्यूरेशनचा फरक असेल. बूस्टर शॉट तेव्हाच दिला जाईल जेव्हा पहिल्या टप्प्यातील लसीचा प्रभाव कमी व्हायला लागेल. रेग्युलर कोविड लस शॉट त्यासाठी दिले जातात जेणेकरून कोविड १९ व्हायरसशी लढण्यासाठी लोकांमध्ये चांगली इम्युनिटी कायम राहील.