CoronaVirus New symptoms : कोरोना व्हायरसचा डोळ्यांवर होतोय गंभीर परिणाम; सुरूवातीला 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:53 AM2021-03-01T11:53:06+5:302021-03-01T12:08:11+5:30

CoronaVirus New symptoms : कोरोनानं संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं पाहायला मिळतात. बीएमजे ऑप्थल्मोलॉजीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डोळ्यामधील लक्षणांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. 

Corona vaccine is doing wonders to some people and even protecting them against many diseases | CoronaVirus New symptoms : कोरोना व्हायरसचा डोळ्यांवर होतोय गंभीर परिणाम; सुरूवातीला 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

CoronaVirus New symptoms : कोरोना व्हायरसचा डोळ्यांवर होतोय गंभीर परिणाम; सुरूवातीला 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

googlenewsNext

कोरोना व्हायरस संसर्गानंतर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. कोरोना नाक, तोंडाच्या माध्यमातून शरीरात पसरतो. याशिवाय डोळ्यांच्या माध्यमातूनही हा व्हायरस हल्ला करू शकतो. तुम्ही संक्रमित भागात स्पर्श केला तर या व्हायरसचा परिणाम तुमच्या डोळ्यांवरही होऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार २ ते ३ टक्के लोक कोरोनानं संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं पाहायला मिळतात. बीएमजे ऑप्थल्मोलॉजीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डोळ्यामधील लक्षणांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. 

प्रकाशाची संवेदनशीलता

अभ्यासानुसार, संशोधनात सामील झालेल्या सुमारे १८ टक्के रुग्णांना प्रकाशाची संवेदनशीलता जाणवली, ज्यास फोटोफोबिया देखील म्हणतात. जेव्हा वातावरणात प्रकाश खूप जास्त असतो तेव्हा हे लक्षण उद्भवू शकते. यामुळे रुग्णांना समस्या उद्भवू शकतात, परिणामी  डोळ्यांची दृष्टी कमी होऊ  शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीत बिघाड होऊ शकतो.

खाज सुटणे, घसा  कोरडा पडणं  देखील कोरोनाचे सामान्य लक्षण असू शकते. या अभ्यासात असे दिसून आले आहे की जवळपास 17 टक्के कोरोना रूग्णांनी खाज सुटलेल्या डोळ्यांबाबत तक्रार केली आहे, तर 16 टक्के लोकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवल्या. खाज सुटणे आणि वेदना देखील डोळ्यांच्या लालसरपणाशी संबंधित असू शकते जे डोळ्यांच्या संक्रमण आणि एलर्जीमुळे उद्भवू शकते. जास्त डोळे चोळल्यानं  ही समस्या आणखी वाढू शकते. काही लोकांना डोळ्यांची जळजळ होणे, लालसरपणा, डोळ्याभोवती मुरुमं आणि वाहणारे नाक किंवा शिंका येणे यासारख्या एलर्जीची लक्षणं देखील दिसू शकतात. सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा...

डोळे लाल होणं चिंतेचं कारण ठरू शकतं का?

बर्‍याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात संक्रमण होण्याची शक्यता देखील असू शकते. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात वेदना होणं किंवा डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना सूज येणं, ज्यामुळे डोळ्याच्या बाहुल्याच्या पांढर्‍या भागावर परिणाम होतो.  अशा समस्यांचा सामना करावा लागतो. Weight Loss: जपानचे लोक या ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधी वाढत नाही लठ्ठपणा...

 नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे पांढरी

नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल झाला असून, एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुप्फुसांची अवस्था अतिशय वाईट पाहण्यास मिळत आहे. रुग्णांची फुफ्फुसे पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.

छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काेराेना रुग्णांच्या फुप्फुसात हळूहळू बदल दिसून येत होता. मात्र, आता फुप्फुस लवकर खराब होत आहेत. ते खराब झाल्यावर रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर उपचार करणे अवघड होत आहे. एक्स-रे रिपोर्टमध्ये फुप्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. यातील बहुतेक वृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.

Web Title: Corona vaccine is doing wonders to some people and even protecting them against many diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.