Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:45 AM2021-05-29T11:45:03+5:302021-05-29T11:48:01+5:30

काही लोकांना पहिला डोज कोविशील्डचा आणि दुसरा डोज कोवॅक्सीनचा दिला गेला. एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारची गडबड आणखीही काही ठिकाणी झाल्याचं नाकारता येत नाही.

Corona Vaccine : Experts administering two different coronavirus vaccines under research | Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

Next

लोकांच्या मनात अजूनही कोरोना वॅक्सीनबाबत (Coronavirus Vaccine) अनेक प्रश्न आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे एक व्यक्ती कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन घेऊ शकतो का? एक्सपर्टचं यावर असं मत आहे की, कोरोना व्हायरसला (Coronavirus) मात देण्यासाठी दोन वेगवेगळ्या वॅक्सीन देण्याबाबत अजून रिसर्च सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये वॅक्सीनची गडबड झाल्याची माहिती समोर आली होती. अशी माहिती मिळाली होती की, काही लोकांना पहिला डोज कोविशील्डचा आणि दुसरा डोज कोवॅक्सीनचा दिला गेला. एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारची गडबड आणखीही काही ठिकाणी झाल्याचं नाकारता येत नाही.  

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयमधील सेंटर ऑफ सोशल मेडिसीन अॅन्ड कम्युनिटी हेल्थ चेअरपर्सन डॉ. राजीव दासगुप्ता म्हणाले की, वॅक्सीन किंवा वॅक्सीनचं कॉम्बिनेशनबाबत सध्या रिसर्च सुरू आहे. ते म्हणाले की, 'वॅक्सीनच्या कॉम्बिनेशनबाबत अजूनही रिसर्च सुरू आहे. ज्याला आम्ही एक होमोलोगस बूस्ट म्हणतो. होमोलोगस बूस्ट अशी वॅक्सीन असते ज्यात समान तंत्र किवा समान प्लॅटफॉर्म असतात. जगभरात ट्रायल्सचे केवळ एक किंवा दोनंच प्रारंभिक रिझल्ट उपलब्ध आहेत. त्याचे अंतिम रिझल्ट अजून मिळाले नाहीत'. (हे पण वाचा : Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता)

'एकाच वॅक्सीनचा डोज द्यावा'

दिल्ली  सरकारने जूनमध्ये कोवॅक्सीनच्या जवळपास ९१, ९६० डोज मिळण्याची अपेक्षा केली आहे. ही वॅक्सीन केवळ दुसऱ्या डोजसाठी वापरल्या जातील. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले होते की, प्रोटोकॉलनुसार, लसीकरण केंद्रांना केवळ एकाच वॅक्सीनचा डोज दिला जावा. पण जर मिश्रण झालं असेल तर कोणताही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही'. ते म्हणाले की, कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या मिश्रणाबाबत भारतात कोणत्याही रिसर्च नाही. पण काही देश यावर रिसर्च करत आहेत. (हे पण वाचा : CoronaVirus News: लवकरच कोरोनाचा गेम ओव्हर? शास्त्रज्ञांनी शोधलं स्वस्त अन् मस्त 'गुप्त हत्यार' )

दोन डोजमधील अंतर

केंद्र सरकारच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार, भारत बायोटेक द्वारे निर्मित कोवॅक्सीनचा पहिली आणि दुसरा डोज याच्यात कमीत कमी चार आठवड्यांचं अंतर असलं पाहिजे. तेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डच्या दोन डोजमधील अंतर कमीत कमी १२ आठवड्यांचं असलं पाहिजे.
 

Web Title: Corona Vaccine : Experts administering two different coronavirus vaccines under research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.