हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
By Manali.bagul | Published: December 16, 2020 11:56 AM2020-12-16T11:56:14+5:302020-12-16T12:09:27+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची योजना तयार केली जात आहे.
भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा ९९ लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे बरे होत असलेल्यांची संख्यासुद्धा ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ९४ लाख २२ हजार लोक संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला देशात ३९ हजारांपेक्षा जास्त सक्रिय केसेस समोर येत आहेत. आता कोरोना व्हायरसला पूर्णपणे नष्ट करण्यसाठी कोरोनाची लस हा एकच उपाय समोर दिसत आहे. केंद्र सरकारने देशात व्यापक लसीकरण अभियान राबवण्यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची योजना तयार केली जात आहे.
कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स
दिल्लीतील लेडी हार्डींग मेडिकल कॉलेजचे डॉ. मधुर यादव यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, प्रत्येक लसीचे साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे कोरोनाच्या लसीचेही साईड इफेक्ट्स असू शकतात. त्यामुळे एलर्जी होणं, ताप येणं, सौम्य ताप येणं अशी लक्षणं दिसून येतात. या लक्षणांची तीव्रता जास्त नसल्यामुळे कमीत कमी वेळात व्यक्तीला बरं वाटू शकतं.
भारतात लसीकरणाचे काम कधी सुरू होणार?
डॉ. मधुर यादव यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला वैज्ञानिकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर देशात लसीकरण सुरू होईल. अमेरिकेत लसीकरण सुरू झाले असून भारतात जोपर्यंत लसीच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण खात्री होणार नाही तोपर्यंत लस देण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. लस देण्याआधी सुरक्षिततेबाबत पूर्ण माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतरच लसीकरणाला सुरूवात होईल.
कोरोनानंतर 'या' देशात नव्या माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात
कोरोना लसीसाठी बुस्टर डोसची आवश्यकता असेल?
डॉ. मधुर यादव यांनी सांगितले की, आता जी लस तयार होईल ती लस दिल्यानंतर चार आठवड्यांनी दुसरा डोजही द्यावा लागेल. दोन डोस घेतल्यानंतर इम्यूनिटी विकसित होईल. या लसीमुळे विकसित झालेली इम्यूनिटी कितीवेळपर्यंत टिकून राहिल हे आता सांगणं कठीण आहे. लसीकरणासाठी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. या लसीमुळे कोरोना प्रमाणेच अनेक ड्रॉपलेट्सद्वारे पसरत असलेल्या आजारांचे प्रमाण कमी होईल.
आता LED लाईट्सने कोरोना व्हायरसचा होणार खात्मा; संशोधनातून तज्ज्ञांचा दावा
अंगदुखी असू शकते का कोरोनाचं संक्रमण?
डॉ. मधुर यादव यांनी सांगितले की, ''जर फक्त अंगदुखीचा त्रास होत असेल तर कोरोनाचं संक्रमण असलेचं असं नाही. इतर अन्य कारणांमुळेही शरीराला वेदनांचा सामना करावा लागतो. जर अंगदुखी सोबतच सर्दी, ताप असेल तर त्वरीत तपासणी करणं गरजेचं आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास तुम्ही निश्चिंत राहून इतर उपायांनी स्वतःची प्रकृती बरी करू शकता. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आली आहेत. ''