Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:32 PM2021-05-13T12:32:46+5:302021-05-13T12:34:34+5:30

Coronavirus Vaccination: सीडीसीच्या मते, लसीकरणानंतर शरीराला संरक्षण तयार करण्यास सुमारे दोन आठवडे लागतात. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे.

Corona Vaccine: How many days should I take the vaccine after recovering from corona ?, read experts say ... | Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...

Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...

Next
ठळक मुद्देसध्या वैज्ञानिक नैसर्गिक आणि लसीपासून निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीविषयी माहिती गोळा करीत आहेत.द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या अहवालात इम्युनोलॉजिस्ट डॉक्टर विनिता बाळ यांनी सांगितले की, कोरोनापासून बरे झाल्यानंतर लसी घेण्यासाठी सहा ते आठ आठवडे थांबले पाहिजे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तसेच, कोरोनावरील लसींच्या पुरवठा संबंधित अडचणी देखील कायम आहेत. यातच ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, लस कधी घ्यावी, असा प्रश्न कोरोनापासून नुकतेच बरे होऊन लस घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मनात आहे. त्यावर एक्सपर्ट्स बरे झाल्यानंतर लस टोचण्याबाबत वेगवेगळ्या कालावधी सांगतात. (for those recovering from the virus here is how long to wait before taking the covid-19 vaccine)

दरम्यान, कोरोनापासून बरे झाल्यानंतर लस घेण्यासाठी किती दिवस प्रतीक्षा करावी, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकेच्या हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, जर एखाद्या व्यक्तीला लसी दिली गेली नसेल तर त्यांना कोविड -१ ९ टेस्ट पॉझिटिव्हच्या पहिल्या दिवसापासून ९० दिवस प्रतीक्षा करावी. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या अहवालात इम्युनोलॉजिस्ट डॉक्टर विनिता बाळ यांनी सांगितले की, कोरोनापासून बरे झाल्यानंतर लसी घेण्यासाठी सहा ते आठ आठवडे थांबले पाहिजे.

दुसरीकडे, लस वैज्ञानिक डॉ. गगनदीप कांग यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,  सहा महिने थांबणे चांगले राहील. जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, नैसर्गिक संसर्गानंतर ६ महिने लसीकरण टाळणे चांगले. कारण नैसर्गिक अँटिबॉडीज शरीरात इतके दिवस राहण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीस पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास, तो पॉझिटिव्ह आल्यापासून ८ आठवड्यांनंतर त्यांना दुसरा डोस दिला जाऊ शकतो.

(Corona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने राहू शकतात अँटीबॉडीज? वाचा सविस्तर)

संसर्ग झाल्यानंतर शरीर अँटिबॉडिज तयार करण्यास सुरवात करते आणि हे लस घेण्यासारखेच आहे. दरम्यान, दुसरा एक डोस घेण्यापूर्वी एक्सपर्ट्स कमीत कमी ८ आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देतात. सध्या वैज्ञानिक नैसर्गिक आणि लसीपासून निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीविषयी माहिती गोळा करीत आहेत. सीडीसीच्या मते, लसीकरणानंतर शरीराला संरक्षण तयार करण्यास सुमारे दोन आठवडे लागतात. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Corona Vaccine: How many days should I take the vaccine after recovering from corona ?, read experts say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.