CoronaVaccine : मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:47 PM2021-09-07T16:47:25+5:302021-09-07T16:48:54+5:30
Corona Vaccine : सध्या जगभरात, कोरोनाच्या विविध लसी आणि त्यांच्या परिणामांसंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच, विविध लसी आणि त्यांच्या परिणामांचीही जबरदस्त चर्चेत आहेत. नुकतेच, भारतात आयोजित ब्रिजिंग फेज 2/3 च्या चाचणीनुसार, ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका (AZD1222) लसीचे लोकल व्हर्जन हे कोरोना विषाणूविरोधात कोविशील्ड, AZD1222 च्यातुलनेत सारखीच प्रतिकारशक्ती निर्माण करते, असे आढळून आले आहे. याचाच अर्थ, भारताची कोविशील्ड लस ही ऑक्सफोर्डच्या एस्ट्राजेनेका सारखीच इम्युनिटी देते. तथापि, या चाचणीचे परिणाम हे एका प्री-प्रिंट अभ्यासाचा भाग असून, त्यांचा रिव्ह्यू अद्याप बाकी आहे. (Corona Vaccine India's covishield gives immunity at par with oxford s astrazeneca says study)
अॅस्ट्राझेनेकाकडून तंत्रज्ञान मिळाल्यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) तयार केलेल्या कोविशील्डला भारतात 2/3 इम्युनो-ब्रिजिंग अभ्यासात इव्हॅलुएट करण्यात आले होते. AZD1222 च्या तुलनेत कोविशील्डमध्ये एक नॉन इंफीरियर इम्यून रिस्पॉन्स आहे.
25 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2020 दरम्यान 1601 स्वयंसेवकांवर अभ्यास करण्यात आला होता. यानंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) नॅशनल ड्रग रेग्युलेटरच्या विषय तज्ज्ञ समितीने मंजुरीची शिफारस केल्यानंतर, या वर्षी 3 जानेवारी रोजी कोविशील्डला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली.
आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? जाणून घ्या...
यातच, अनेक ठिकाणी बनावट लस दिली जात असल्याच्या बातम्याही आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींच्या धंद्याचा खुलासा झाला. अलीकडेच, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत बनावट कोविडशील्डच्या लसी सापडल्या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींपासून सावध राहण्याचा इशाराही दिला होता. याच संदर्भात आता केंद्र सरकारने राज्यांना, असे अनेक स्टॅंडर्ड्स (मानके) सांगितली आहेत, ज्याच्या आधारे आपल्याला दिली जात असलेली लस खरी आहे की बनावट हे समजू शकेल.
खरी लस ओळखता यावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे. यावरून, लस पाहताच ती खरी आहे, की बनावट हे ओळखता येईल. लस खरी आहे, की बनावट हे ओळखण्यासाठी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूतनिक-व्ही, या तिन्ही लसींवरील लेबल, त्यांचा कलर, ब्रँडचे नाव यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.