Corona vaccine: ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:18 AM2021-03-27T05:18:43+5:302021-03-27T06:14:40+5:30

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फायझर-बायोएनटेक विकसित कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी सुरू केली आहे.

Corona vaccine Pfizer launches vaccine test on children under 12; Expect reports in the second half of this year | Corona vaccine: ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

Corona vaccine: ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

Next

न्यूयाॅर्क : अमेरिकेतील फायझर कंपनीने ११ वर्षांहून कमी वयाच्या मुलांवर काेराेना लसीची चाचणी सुरू केली आहे. जर्मनीची ‘बायाेएनटेक’ या कंपनीच्या सहकार्यातून ही लस विकसित करण्यात येत आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फायझर-बायोएनटेक विकसित कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी सुरू केली आहे. त्यासाठी जागतिक लसीकरणाच्या मोहिमेंतर्गत निरोगी मुलांना लसीचा पहिला डाेस दिला आहे. कंपनी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मिती करण्याच्या विचारात असून, त्यासंदर्भातच चाचण्या सुरू आहेत. 

पहिल्या टप्प्यात १४४ मुलांवर चाचणी
लहान मुलांसाठी फायझरने दाेन डाेस आवश्यक असलेली लस विकसित केली आहे. त्यासाठी १०, २० आणि ३० ग्रॅमच्या तीन विविध क्षमतेच्या डाेसची चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याच्या चाचणीसाठी १४४ जणांचा समावेश आहे. त्यानंतर ४,५०० मुलांचा या अहवाल २०२१ च्या उत्तरार्धात उपलब्ध हाेण्याची कंपनीला अपेक्षा आहे. कंपनीने यापूर्वीच १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी लसीची चाचणी सुरू केली. 

 

Web Title: Corona vaccine Pfizer launches vaccine test on children under 12; Expect reports in the second half of this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.