युद्ध जिंकणार! रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 07:22 PM2020-08-04T19:22:45+5:302020-08-04T19:28:31+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशियानं बाजी मारली आहे. लसीच्या चाचण्यांच्या सगळ्याच टप्प्यात रशिया आघाडीवर आहे.
कोरोनाच्या संक्रमणाने जगभरात हाहाकार पसरवला आहे. देशात आतापर्यंत १८ लाख लोक संक्रमणाचे शिकार झाले असून मृतांचा आकडा ३९ हजारांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशियानं बाजी मारली आहे. लसीच्या चाचण्यांच्या सगळ्याच टप्प्यात रशिया आघाडीवर आहे.
कोरोनाच्या लसीबाबत एका सकारात्मक माहिती समोर येत आहे. पुढच्या महिन्यापासून रशियात कोरोनाच्या लसीचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन सुरू होणार आहे. रशियातील संस्था टीएएसएसने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या काळातील देशाच्या गरजा लक्षात घेता कोरोनाच्या लसीचे उत्पादन केलं जात आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या लसीचे उत्पादन सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल. रशियाच्या सुक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंच्या लसीचे ट्रायल शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे.
ही लस गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर आफ ऐपीडेमीलॉजी ऐंड माइक्रोबॉयोलॉजीद्वारे तयार केले जाणार आहे. या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी असलेल्या सगळ्याच स्वयंसेवकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. स्पूटनिक माध्यमांनी सुरक्षा मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ही लस दिल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लस दिल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती आधीच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे कार्य करत आहे.
दरम्यान कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. या स्वयंसेवकांची बुरडेंका रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री डेनिस मोंटेरोव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन चाचणीचे टप्पे यशस्वी होण्यावर अवलंबून आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून या लसीचे लाखो डोस तयार केले जाणार आहेत.
WHO चा दणका! आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ
कोरोनाच्या 'या' औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरूवात; लवकरच औषध उपलब्ध होणार