Corona Vaccine Survey: कोरोनाविरोधात कोव्हॅक्सिन की कोव्हीशिल्ड ताकदवर? पुण्यातील लोकांवरही संशोधन....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 09:14 AM2023-01-08T09:14:11+5:302023-01-08T09:14:32+5:30
दोन्ही लसींनी सेरोनेगेटिव्ह आणि सेरोपॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये किंवा कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्यांमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय अँटीबॉडीज पातळी प्राप्त केली आहे.
देशातील विविध केंद्रांच्या एका सर्वेक्षणानुसार कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोव्हिशिल्डची लस घेणाऱ्यांना कोरोना व्हायरसच्या चिंताजनक व्हेरिअंटविरोधात अधिक सुरक्षा मिळाली आहे. हा अभ्यास शुक्रवारी ‘मेडआरजिव (medRxiV)’ सर्व्हरवर पोस्ट करण्यात आला. या संशोधनावर अद्याप समीक्षा करण्यात आलेली नाही.
दोन्ही लसींनी सेरोनेगेटिव्ह आणि सेरोपॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये किंवा कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्यांमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय अँटीबॉडीज पातळी प्राप्त केली आहे. जून 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान, संशोधकांनी शहरी आणि ग्रामीण बेंगळुरू आणि पुणे या चार ठिकाणी 18-45 वयोगटातील 691 वक्तींवर अभ्यास केला.
यामध्ये Covaxin चे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने किंवा Covishield चे दोन डोस तीन महिन्यांच्या अंतराने दिले गेले. ज्या लोकांनी 'कोविडशील्ड' घेतले त्यांनी SARS-CoV-2 विषाणू आणि त्याच्या चिंताजनक प्रकारांविरूद्ध 'कोव्हॅक्सिन' लस घेतलेल्या लोकांपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती विकसित केली.
य़ाचा अर्थ असा नाहीय की कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना कोरोनापासून सुरक्षा मिळाली आणि कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना नाही, तर कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना देखील मजबुत सुरक्षा मिळाली आहे. विश्लेषणासाठी सहा टाइम पॉइंट्स आणि सेल्युलर विश्लेषणासाठी चार टाइम पॉइंट्सवर सहभागींचे नमुने घेण्यात आले.
संशोधकांना असे आढळून आले की दोन्ही लसींनी लसीकरणपूर्व लसीकरणाच्या तुलनेत सेरोनेगेटिव्ह आणि सेरोपॉझिटिव्ह दोन्ही व्यक्तींमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे. कोविशील्डने सेरोनेगेटिव्ह व्यक्ती आणि सेरोपॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये कोवॅक्सिनपेक्षा चांगला परिमाण आणि उत्तम रोगप्रतिकारक प्रतिसाद प्राप्त केला.
इम्युनोलॉजिस्ट विनिता बल यांनी सांगितले की, तरुण आणि प्रौढ लोकांमध्ये कोविड लसींच्या परिणामांमध्ये फरक आहे. अँटीबॉडीजसोबत टी सेलचा प्रतिसाद हे संरक्षणाचे अप्रत्यक्ष सूचक आहेत. कोविशील्ड लसीकरण मूळ SARS-CoV2 विरुद्ध मजबूत तटस्थ अँटीबॉडींना प्रेरित करते. Covaxin देखील कमी कार्यक्षमतेने हे करते. यामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना घाबरण्याचे कारण नाहीय.