'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 05:51 PM2020-11-01T17:51:35+5:302020-11-01T18:04:20+5:30
CoronaVirus News & Latest Updates : भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसन थैमान घातलं आहे. काही देशात कोरोनाचा कहर इतका वाढला आहे. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी, इटली यांसह इतर देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या भयानक माहामारीपासून बचाव करण्यासाठी लस कधी मिळणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे. भारतातही स्वदेशी कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेक कंपनीतील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
सध्या कंपनीचे उद्दिष्ट देशभरातील लसीची टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्ट्रेनमधून तयार केली आहे. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ही लस भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे.
या लशीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सध्या सुरू आहे. या लशीचं उत्पादन करण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱ्या दुकानांना किंवा कंपन्यांना या लशीचा पुरवठा करण्याबाबत विचार सुरू आहे. या लसीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित
सिरम इंस्टिट्यूची कोविशिल्ड लस कधी येणार?
आदर पूनावाला म्हणाले, "आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या विचाराने काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल." सिरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसचा पहिला भाग 2021 च्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्डची कोरोना लस अत्यंत स्वस्त आणि सगळ्यांना परवडणारी असेल.
लसीकरणाबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी सांगितले की,'' या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल की नाही याबाबत मत मांडणं घाई करण्यासारखं ठरेल. चाचण्यांचे यश हे रोगप्रतिकारक शक्ती आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. जर आपतकालीन परवान्यासाठी अर्ज केला नाही तर आमची चाचणी जानेवारीपर्यंत संपली पाहिजे आणि त्यानंतर आम्ही यूकेतील चाचणी प्रक्रिया जानेवारीमध्ये भारतात दाखल करू शकतो. ''
पुढे त्यांनी सांगितले की, ''सध्या लसीची अडवांस चाचणी सुरू आहे. ब्रिटनने कोरोनाबाबत डेटा दिल्यास आपातकालीन स्थितीतील चाचणीसाठी आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिलं जाणार आहे. मंत्रालयातून मंजूरी मिळाल्यानंतर चाचण्या भारतात केल्या जाणार आहेत. जर हे सगळं नियोजन यशस्वी ठरले तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होऊ शकते.''पॉझिटिव्ह बातमी! देशात पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मासिक घट; ऑक्टोबरमध्ये घटली ३० % रुग्णसंख्या