पॉझिटिव्ह बातमी! ६ कोटी लोकांना लवकरच कोरोनाची लस मिळणार; पुण्याच्या सिरमनं तयार केली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 01:19 PM2020-11-16T13:19:54+5:302020-11-16T13:28:03+5:30

CoronaVirus News & Latest Updates : देशात कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत ६ कोटी लसींचे डोस तयार केले आहे. 

Corona vaccine update serum institute has now prepared 60 million vaccine dose | पॉझिटिव्ह बातमी! ६ कोटी लोकांना लवकरच कोरोनाची लस मिळणार; पुण्याच्या सिरमनं तयार केली लस

पॉझिटिव्ह बातमी! ६ कोटी लोकांना लवकरच कोरोनाची लस मिळणार; पुण्याच्या सिरमनं तयार केली लस

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. कोरोनाची प्रभावी लस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण लॉकडाऊन उठवण्यात आलेलं असलं तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. दिवसेंदिवस धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. भारतातील लस निर्माता कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून सकारात्मक माहिती समोर येत आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत ६ कोटी लसींचे डोस तयार केले आहे. 

सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक यांनी लशीची तयारी सुरु केली आहे. सिरम संस्थेने आतापर्यंत ६ कोटी डोस तयार केले आहेत, तर भारत बायोटेकनेही उत्पादन सुरू केले आहे. कोरोना लस भारतात तयार होण्याबरोबरच रशियाची स्पुतनिक -5 ही लसही भारतात दाखल झाली असून लवकरच त्याचे उत्पादन सुरू केले जाऊ शकते. फार्मा कंपनी ज्या वेगानं कोरोना लस तयार करत आहेत, ते पाहता लवकरच कोरोनावर मात करू शकणारी लस उपलब्ध होऊ शकते. येत्या काही महिन्यांत अनेक कोरोना लस बाजारात उपलब्ध होऊ शकतात. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या ३० कोटी लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे.

डिसेंबरच्या सुरूवातीला लसीकरण  सुरू होण्याची शक्यता

दरम्यान एक्स्ट्राजेनका चे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी सांगितले आहे की, ''डिसेंबरच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेने आपातकालीन परवाना दिल्यानंतर सीरम हाच डेटा भारतीय भागांकडे जमा करेल.''  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी सांगितले होते की, ''एक सुरक्षित आणि प्रभावी लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला उपलब्ध होईल.  चाचणी यशस्वी ठरली आणि रेग्यूलेटरी अप्रुव्हल मिळाले तर जानेवारीमध्येच लस तयार होऊ शकते.

मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

भारतात फेज 2/3 चाचणीअंतर्गत हजारो  लोकांना कोविशील्डही लस दिली जाणार आहे. लसीचे दीर्घकालीन परिणाम दिसण्यासाठी  दोन ते तीन वर्षाचा कालावधी  लागू शकतो. कोविशिल्ड लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी याासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लस ही स्वस्त दरात उपलब्ध होईल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ''  डिसेंबरपर्यंत या लसीच्या आपातकालीन स्थितीतील वापरासाठी मंजूरी मिळू शकते. अशी शक्यता आदर पुनावाला यांनी व्यक्त केली होती. 

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

Web Title: Corona vaccine update serum institute has now prepared 60 million vaccine dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.