Corona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे! वाहनात बसूनच लस मिळाली तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:28 AM2021-05-16T09:28:05+5:302021-05-16T09:28:29+5:30

किती सोयीस्कर ! खिडक्या बंद केल्या की, किती सुरक्षित! पण चारचाकी नसेल तर? शासनातर्फे अल्पशा भाड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्सी उपलब्ध करता येईल का?

Corona Vaccine What if you get vaccinated while sitting in a vehicle? | Corona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे! वाहनात बसूनच लस मिळाली तर?

Corona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे! वाहनात बसूनच लस मिळाली तर?

Next

डॉ. मंगला बोरकर प्राध्यापक, जेरियाट्रिक्स, 

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी), औरंगाबाद यापूर्वी अमेरिकेत, आता भारतात सुद्धा ‘ड्राइव्ह-इन’ लसीकरण होऊ घातले आहे. चार चाकीतून यायचे, गाडीत बसूनच लस घ्यायची, अर्धा तास जवळपास नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे! किती सोयीस्कर ! खिडक्या बंद केल्या की, किती सुरक्षित! पण चारचाकी नसेल तर? शासनातर्फे अल्पशा भाड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्सी उपलब्ध करता येईल का? सुरक्षिततेसाठी ड्रायव्हर आणि मागच्या सीटमध्ये अ‍ॅक्रिलिकचे पार्टिशन ठेवल्यास उत्तम! 

नोंदणी करून, वेळ देऊन बोलवावे

डॉ. उज्ज्वला रवी झंवर, कन्सल्टिंग फिजिशियन 

ही सोय फक्त दिव्यांग व ज्येष्ठांसाठीच असावी.
लसीकरण झाल्यावर थांबण्याची, त्रास झाल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना कळविण्याची व उपचार मिळण्याची यंत्रणा असावी.
नोंदणी करूनच, वेळ देऊन पात्र नागरिकांना बोलवावे.
आवाक्यात असतील तितक्याच नोंदणी कराव्या म्हणजे वाहतूक कोंडी, होतकरूंची निराशा टळेल.
लसीविषयीची माहितीदर्शक फलके, पोस्टर्स असावेत. 

डॉ. सुरेंद्र जयस्वाल, कन्सल्टिंग फिजिशियन

‘ड्राइव्ह-इन’ लसीकरणाचे फायदे

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित.
अपंगांसाठी सुलभ.
सुरक्षित अंतर आपोआप शक्य.
पुढे गरोदर स्त्रियांसाठीही आरामदायी होईल.

हायवेवर ट्रक ड्रायव्हर्सचे लसीकरण नियोजित करावे.
ऊन-पावसात सोयीस्कर.
जागा मोठी हवी- मॉल, इतर पार्किंग, पटांगण.

Web Title: Corona Vaccine What if you get vaccinated while sitting in a vehicle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.