काळजी वाढली! लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांच्या चिंतेत वाढ; एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:03 PM2020-10-31T12:03:29+5:302020-10-31T12:06:19+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कॉलेज लंडन आणि मार्केट रिसर्च फर्म इम्पोसिस मोरी यांनी दावा केला आहे की, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये व्हायरसच्या एंटीबॉडीज कमी वेळात नष्ट होतात. लक्षणं नसलेल्या रुग्णांना पुन्हा संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो.
कोरोना व्हायरसची लक्षणं ज्या लोकांमध्ये दिसून येत नाहीत. म्हणजेच जे असिम्प्टेमॅटिक रुग्ण असतात. त्याच्यासाठी चिंताजनक ठरणारी बाब समोर येत आहे. कोरोनाच्या माहामारी अनेक रुग्णांना संक्रमण झालेलं असतानाही लक्षणं दिसून येत नव्हती. कॉलेज लंडन आणि मार्केट रिसर्च फर्म इम्पोसिस मोरी यांनी दावा केला आहे की, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये व्हायरसच्या एंटीबॉडीज कमी वेळात नष्ट होतात. लक्षणं नसलेल्या रुग्णांना पुन्हा संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो.
मंगळवारी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार इंपीरियल कॉलेजसह इम्पोसिस मोरी या संशोधकांनी दावा केला आहे की, ७५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांपासून १८ ते २४ वयोगटातील रुग्णांमध्ये 'लॉस ऑफ एंटीबॉडीज' ही क्रिया संथ गतीने होते. जूनचा मध्य ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत इंग्लँडमध्ये लाखो लोकांच्या नमुन्यांवर परिक्षण करण्यात आले होते. त्यात असं दिसून आलं की, एंटीबॉडी असलेल्या लोकांची संख्या जवळपास तीन महिन्यात २६.५ टक्क्यांनी कमी झाली होती.
साहाय्यक आरोग्य अधिकारी जेम्स बॅथेल यांनी सांगितले की, ''हा या शोधाचा महत्वपूर्ण भाग आहे. ज्यामुळे कोविड १९ च्या एंटीबॉडीचा प्रभाव समजण्यास मोठी मदत होऊ शकते. वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा देत सांगितले की, व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली लॉग्न टर्म एंटीबॉडीबद्दल अजूनही पूर्ण माहिती समोर आलेली नाही. ''
इम्पीरियलच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे पॉल एलियट यांनी सांगितले की, ''शरीरात एंटीबॉडीचे प्रमाण किती असते? रोगप्रतिकारकशक्ती कितीवेळ व्हायरसपासू लढू शकते याबाबत अनेक गोष्टी अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत. या अभ्यासात ३, ६५,००० वयस्कर लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. ज्यांना २० जून ते २८ सप्टेंबर या कालावधीत कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनाव्हायरस एंटीबॉडीजसाठी त्यांनी घरी तीन राउंड फिंगर प्रिंट चाचणी करून घेतली होती.'' या संशोधनातून समोर आलं की, तीन महिन्यांमध्ये जवळपास एंटीबॉडी असलेल्या लोकांची संख्या २६.५% कमी झाली होती. म्हणजेच देशात एंटीबॉडी असलेली लोकसंख्या ६.०% वरून कमी होऊन ४.४% पर्यंत होती.
प्रमुख लेखक हेलेन वॉर्ड यांनी सांगितले की, ''हा खूप मोठा अभ्यास आले. ज्याद्वारे रुग्णांच्या एंटीबॉडी कमी होताना दिसून येत आहेत. अशा लोकांना कोविड -१९ चा पुन्हा संसर्ग होईल की नाही हे आम्हाला माहिती नाही. परंतु सर्व लोकांना सतत मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल जेणेकरून इतरांसह स्वतःला उद्भवणारा धोका कमी होऊ शकेल. यापूर्वी एका अहवालात असेही म्हटले गेले होते की सौम्य लक्षणे नसलेले रुग्ण लवकर बरे होतात. ''
गरज असेल तरच घराबाहेर पडा; एम्सच्या तज्ज्ञांची सुचना
युरोप आणि इतर देशांचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया म्हणाले होते की, ''मास्कचा वापर करायला हवा. आवश्यक काम नसल्यास घराबाहेर जाऊ नये. जर व्हायरसपासून बचावसाठी खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा प्रसार अजून वाढू शकतो. तरूणाई या व्हायरसच्या प्रसाराबाबत जास्त गंभीर नाही. अनेकजण निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. तरूणांना वाटतं की सौम्य संक्रमण झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या माध्यमातून घरातील वृद्धांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे. ''
प्रदूषण आणि कोरोनाच्या दुहेरी संकटाबद्दल एम्सचे संचालक म्हणाले होते की, ''जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत बाहेर जाऊ नका. जर जाणे आवश्यक असेल तर मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टेंसिंग पाळा. सुर्यप्रकाशात बाहेर पडा. कोरोना संक्रमणाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशीच घट पाहायला मिळाली तर कोरोनाची माहामारी नष्ट होण्यास मदत होऊ शकते.'' मोठा दिलासा! येत्या डिसेंबरमध्ये कोरोनाची लस येणार?; आदर पुनावालांनी सांगितले की....
दुसऱ्यांदाही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण
दिवाळी आणि छठपूजा यांबाबत बाोलताना यांनी सांगितले होते की, ''गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. आरोग्याची काळजी घेऊन सण उत्सव साजरे करा. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका असू शकतो. रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली तर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. काही लोकांची प्रतिकारशक्ती तीन ते चार महिन्यांनंतर हळूहळू कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत संरक्षण किती काळ राहील हे सांगणे कठीण आहे.'' दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा