घरात सॅनिटायजर ठेवताना ही चूक कराल; तर दुर्घटनेला निमंत्रण द्याल, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:26 PM2020-06-05T17:26:01+5:302020-06-05T17:29:05+5:30

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.  

Corona virus be careful during sanitizer in kitchen at home | घरात सॅनिटायजर ठेवताना ही चूक कराल; तर दुर्घटनेला निमंत्रण द्याल, 'अशी' घ्या काळजी

घरात सॅनिटायजर ठेवताना ही चूक कराल; तर दुर्घटनेला निमंत्रण द्याल, 'अशी' घ्या काळजी

Next

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी साबण किंवा सॅनिटायजरने हात धुणं महत्वाचं आहे. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस नष्ट करण्याासाठी तसंच किटाणूंना मारण्यासाठी अल्कोहोल युक्त सॅनिटायजर फायदेशीर ठरतं. सॅनिटायजरचा वापर करत असाताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. नाहीतर दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो. 

सॅनिटायजर सध्याच्या परिस्थीतीत जीवनावश्यक वस्तूंपैकी एक बनली आहे. पण सॅनिटायजरचा वापर लोकांनी खूप आधीपासूनच केला असता तर ही वेळ आलीच नसती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.  

अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर ज्वलनशील असतं.  त्यामुले सॅनिटाजरच्या बॉटल्स स्वयंपाकघरापासून  दूर ठेवा.

ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी सॅनिटायजर ठेवू नका. 

वीजेची वायरिंग, गॅस स्टोव्ह यांच्या आसपासही सॅनिटायजर ठेवू नका. 

याव्यरिक्त सॅनिटायजरची बॉटल उघडी ठेवू नका. घट्ट झाकण लावून लहान मुलांपासून दूर ठेवा.

 सॅनिटायजरची बॉटल स्मोकिंग झोनपासून लांब ठेवा. 

सतत वापर  न करता जेव्हा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तेव्हा सॅनिटायजरचा वापर करा. 

रुग्णांच्या संपर्कात आल्यास किंवा लक्षणं दिसूनही कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह येते कशी ; जाणून घ्या

खुशखबर! कोरोनाच्या औषधांबाबत अमेरिकेतील कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या

Web Title: Corona virus be careful during sanitizer in kitchen at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.