Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:47 PM2021-05-04T13:47:17+5:302021-05-04T14:00:47+5:30
Corona virus : लवकर रिकव्हर होण्याच्या नादात लोक स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत आहेत. ही गोष्ट धोकादायक ठरू शकते.
कोरोना व्हायरसच्या माहामारीत संपूर्ण देशभरातील लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात आयसीयू बेड, ऑक्सिजनची कमतरता, औषधांची टंचाई यांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत नसल्यानं सौम्य लक्षणं असलेल्यांना घरीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. अशावेळी लवकर रिकव्हर होण्याच्या नादात लोक स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत आहेत. ही गोष्ट धोकादायक ठरू शकते.
नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सिस्टमॅटिक स्टेरॉईडच्या ओव्हर डोजमुळे रुग्णांना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून जेव्हा सुरूवातीच्या स्टेजला या औषधांचा वापर केला जातो तेव्हा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. कोरोनाच्या इन्फेक्शनदरम्यान या औषधांचा वापर न करण्याचा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''लोकांना वाटतं की रेमडेसिविर आणि इतर औषधं स्टेरॉईड्सप्रमाणे मदत करतील. पण यांची गरज नेहमीच असतेच असं नाही. याबाबत लोकांना कल्पना नाही. म्हणून फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्यायला हवीत. कोरोनाच्या २ स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये व्हायरसचं संक्रमण झाल्यानं तापची समस्या उद्भवते. हळूहळू व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचू लागतो. त्यानंर ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागते. अशावेळी एंटी व्हायरल ड्रग्स दिले जातात.''
''दुसऱ्या टप्प्यात संक्रमित व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती काम करणं पूर्णपणे बंद होते. अशा स्थितीत शरीरात इंफ्लेमेटरी रिएक्शन वाढू लागते. यावेळी रुग्णाच्या शरीराला स्टेरॉईड्सची आवश्यकता असते. सुरूवातीच्या स्टेजला ही औषधं दिल्यास शरीरातील व्हायरसचे रेप्लिकेशन वाढू शकते. म्हणजेच अशावेळी शरीरातील व्हायरस वेगानं आपली संख्या वाढवतो.'' असं ही ते यावेळी म्हणाले
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
दरम्यान संक्रमण झाल्यानंतर लोक सीटी स्कॅन करत आहेत. ज्याच्या किमती खूपच वाढल्या आहेत. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे की सिटी स्कॅनचा वापर करायचा की नाही ते विचारपूर्वक ठरवायला हवे. त्यांनी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की,'' सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे.''
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
''घरात आयसोलेशनमध्ये राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सेचुरेशन ९३ किंवा त्याहून कमी होत आहे, हे अशक्त होण्याचे लक्ष आहे. अशा स्थितीत जर आपल्याला छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.'' असंही त्यांनी सांगितले.