Coronavirus : खुलासा! कोणत्याही खास ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोना टार्गेट करत नाही - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:04 AM2020-07-20T10:04:45+5:302020-07-20T10:14:38+5:30
कमजोर इम्यूनिटी, वयोवृद्ध आणि गंभीर रूपाने आजारी लोकांना याचा अधिक धोका आहे. तसेत ब्लड ग्रुप आणि कोरोनाबाबतही एक दावा रिसर्चमधून करण्यात आला होता. मात्र, याबाबत एक नवा रिसर्च समोर आला आहे.
जगभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाबाबत रिसर्चही सुरू आहेत. त्यातून कोरोनावरील उपचार, लक्षणे, प्रभाव, वॅक्सीनबाबत रिसर्च सुरू आहेत. कोरोनाबाबत करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आले आहे की, कमजोर इम्यूनिटी, वयोवृद्ध आणि गंभीर रूपाने आजारी लोकांना याचा अधिक धोका आहे. तसेत ब्लड ग्रुप आणि कोरोनाबाबतही एक दावा रिसर्चमधून करण्यात आला होता. मात्र, याबाबत एक नवा रिसर्च समोर आला आहे.
कोरोना महामारीता ब्लड ग्रुपसोबत काही संबंध आहे की नाही याबाबत मार्चमध्ये चीनमध्ये रिसर्च झाला होता. त्यानंतर यावर जर्मनीमध्ये रिसर्च करण्यात आला होता. यात ब्लड ग्रुपच्या आधारावर लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांच्या टीमने हा रिसर्च नाकारला होता. चला जाणून घेऊ नव्या रिसर्चबाबत...
अमेरिकेतील रिसर्च जर्नल नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार ए ब्लड ग्रुप किंवा ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी किंवा जास्त नसतो. तर आधीच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, ए ब्लड ग्रुप असलेले लोक व्हायरसच्या जाळ्यात सहजपणे अडकतात. तसेच ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना व्हायरसचा धोका कमी राहतो.
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने जुन्या रिसर्चमधील दावे धुडकावून लावले आहेत. तेच मॅसाच्युसेट्स हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉ. अनाहिता दुआ म्हणाल्या की, रिसर्चमध्ये असे कोणतेही तथ्य मिळाले नाहीत, ज्यांच्या आधारावर सांगितलं जाऊ शकेल की, एखाद्या खास ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोना लवकर होऊ शकतो.
दरम्यान, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये गेल्या महिन्यात कोरोना महामारीबाबत एक रिसर्च प्रकाशित झाला होता. ज्यात दावा करण्यात आला होता की, ए ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना दुसऱ्या ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोनाचा धोका ४५ टक्के जास्त असतो. तेच हॉंगकॉंगमधील एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांवर सार्स सारख्या व्हायरसचा प्रभाव कमी होतो.
हे दोन्ही रिसर्च जेव्हा प्रसारमाध्यमातून समोर आले होते तेव्हा लोक घाबरले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांच्या टीमने कोरोना महामारीचा ब्लड ग्रुपसोबत संबंधाबाबत रिसर्च केला. या रिसर्चमध्ये जुन्या रिसर्चमधील दावे नाकारले गेले. जर्मनीतील कील युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांना रिसर्चमध्ये सांगितले होते की ए ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक राहतो.
कोविड 19 मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 'हा' आहे सगळ्यात मोठा फरक
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर