Corona virus : मास्क तर होतेच पण आता सॅनिटायझर सुद्धा बनावट, कारखान्यावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:57 AM2020-03-12T10:57:22+5:302020-03-12T11:03:44+5:30
कोरोना व्हायरसपासून पासून बचाव करण्यासाठी तुम्ही वापरत असलेला मास्क आणि सॅनिटायझर बनावट सुद्धा असू शकतो.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यामातून जागृती केली जात आहे. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळेच लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करत आहेत. अनेक ठिकाणी सॅनिटायजरचा तुटवडा पडला आहे. पण तुम्हाला कल्पनाही नसेल तुम्ही ज्या सॅनिटायर्सचा वापर कोरोनापासून बचाव होण्यासाठी करत आहात ते बनावट सुद्धा असू शकतात.
काश्मीरमध्ये असे बनावट हँड सॅनिटायझर सापडलेत. कोरोना व्हायरसच्या भीतीनं लोकं हँड सॅनिटायझरचा भरपूर वापर करत आहेत, त्यामुळे मागणी वाढली आहे आणि याचा फायदा घेत काश्मीरमध्ये बनावट हँड सॅनिटायझर बनवलं जातं आहे. काश्मिर मधिल औषध आणि अन्न नियंत्रण विभागानं या ठिकाणी छापे टाकले आहेत. शिवाय याआधी अशा हँड सॅनिटायझर बाजारातही गेलेत.
यानंतर प्रशासनाने नागबल गांदरबलमधील युनिट सील केलं आणि त्याचे दुवे एचएमटी श्रीनगर औद्योगिक वसाहतीत सापडले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी बनावट मास्कची विक्री केली जात असल्याचं समोर आलं होतं. आता मास्कनंतर बाजारात आलेले सॅनिटायझरही बनावट असू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी. ( हे पण वाचा- Corona virus : कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलेच्या अनुभवाची व्हायरल पोस्ट)
याआधी जम्मूमध्ये कप सिरफमध्ये विषारी पदार्थ असल्याचं निर्दशनासआलं होतं. ज्यामुळे 9 मुलांचा मृत्यू झाला होता. कोल्ड बेस्ट पीसी कफ सिरप हे औषध हिमाचल प्रदेशमधील डिजिटल व्हिजन नावाची कंपनी तयार करते. चंदीगड इथल्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कफ सिरपमुळेच 9 मुलांचा मृत्यू झाला आहे.
या कफ सिरपमध्ये Diethylene Glycol या विषारी पदार्थ आढळला आहे. जो हानीकारक आहे. त्यानंतर 8 राज्यांमध्ये या कफ सिरपच्या विक्रीवर बंद घालण्यात आली आहे. या राज्यात पोहोचलेल्या औषधाच्या बाटल्या परत मागवण्यात आल्या आणि त्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. ( हे पण वाचा- ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल)