Corona virus : आता कोरोनासाठी फक्त ४९९ रुपयांमध्ये देशातील पहिली इन्शुरन्स योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:52 PM2020-03-19T16:52:56+5:302020-03-19T16:53:26+5:30

क्लिनिक हेल्थकेअरने त्यांच्या  कोरना व्हायरसने इन्फेक्टेड असणाऱ्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना लाँच केली आहे.

Corona virus : Healthcare launch a insurance plan for covid 19 in just rupess 499 myb | Corona virus : आता कोरोनासाठी फक्त ४९९ रुपयांमध्ये देशातील पहिली इन्शुरन्स योजना

Corona virus : आता कोरोनासाठी फक्त ४९९ रुपयांमध्ये देशातील पहिली इन्शुरन्स योजना

Next

सध्या कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.  अशा परिस्थीत कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक खबरदारीचे उपाय  घेतले जात आहे.  भारतात कोरोना जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  वाढती रुग्णांची संख्या विचारात  घेता  क्लिनिक हेल्थकेअरने मोठी निर्णय घेतला आहे. यात क्लिनिक हेल्थकेअरने पहिला काँप्रेहेंसिव्ह प्रोटेक्शन प्लॅन सुरु केला आहे. क्लिनिक हेल्थकेअरने त्यांच्या  कोरना व्हायरसने इन्फेक्टेड असणाऱ्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना लाँच केली आहे.

या इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक जर कोरोनाबाधित असतील तर, या आजारासंबधित गरजांसाठी ३६० डिग्री कव्हरेज ‘कोरोना व्हायरस सपोर्ट प्लॅन’मधून देण्यात येणार आहे. ४९९ रुपयांपासून हा प्लॅन उपलब्ध आहे. यांच्या वेबसाइटवरून तुम्हाला प्लॅनबद्दल अधिक माहिती मिळवता येऊ शकते. 

कसा असेल प्लॅन

कोरोना व्हायरस सपोर्ट प्लॅन’मध्ये प्राथमिक काळजी आणि आर्थिक सेफ्टी पाहिली जाणार आहे. 
ज्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला, २४ तास डॉक्टरांची मदत आणि कोरोना व्हायरससंबधित रुग्णालयामध्ये भर्ती झाल्यानंतर त्यासंबधित कोणत्याही खर्चावर १ लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर उपलब्ध आहे.
क्लिनीककडून एक ऑल इन वन सोल्यूशन सुद्धा देत आहे. बिझनेस किंवा कॉर्पोरेट सेक्टरसाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

चीन आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणूनच भारतामध्ये अद्याप कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये या इन्शुरन्स कंपनीकडून ४९९ रुपयांपासून इन्शुरन्स प्लॅन आखण्यात आले आहेत.

याशिवाय मोफत दूरध्वनीसेवा उपलब्ध क्लिनिक हेल्थकेअरने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे  लोकांना कोरोना व्हायरस विषयी काही प्रश्नांसाठी योग्य  डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. ( हे पण वाचा- Coronavirus: कोरोनाबद्दल सोशल मीडियात चुकीच्या अफवा; 'या' दाव्यांवर विश्वास ठेवू नका)

कोरोनाची लक्षणं,  उपाययोजना आणि तपासणी प्रक्रिया याची माहिती तुम्ही एका कॉलद्वारे मिळवू शकता. या विनामूल्य सेवेचा हेल्पलाइन नंबर 8861188846 हा आहे. यावर मिस्ड कॉल देऊन किंवा कंपनीला तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर #askcorona असा हॅशटॅग वापरून प्रश्न विचारू शकता. ( हे पण वाचा- Corona virus : पाच दिवसात 'ही' लक्षणं दिसली, तर कोरोनाची तपासणी लगेच करा नाहीतर....)

Web Title: Corona virus : Healthcare launch a insurance plan for covid 19 in just rupess 499 myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.