Corona virus : गोमुत्र आणि शेणाने कोरोना व्हायसरपासून खरंच बचाव होतो का? एक्सपर्टस काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:01 AM2020-03-05T10:01:48+5:302020-03-05T10:14:24+5:30

कोरोना व्हायरस हा एक मीटरपर्यंत हवेत पसरत असतो. पण कोणतंही सामान किंवा वस्तुला चिकटल्यानंतर अनेक तासांपर्यंत  कोरोनाचे विषाणू  अनेक तासांपर्यंत जिवंत राहत असतात.

Corona virus: How to prevent coronavirus and be safe in india myb | Corona virus : गोमुत्र आणि शेणाने कोरोना व्हायसरपासून खरंच बचाव होतो का? एक्सपर्टस काय सांगतात

Corona virus : गोमुत्र आणि शेणाने कोरोना व्हायसरपासून खरंच बचाव होतो का? एक्सपर्टस काय सांगतात

Next

कोरोना व्हायरस चीननंतर संपूर्ण जगभरात झपाट्याने पसरत आहे.  भारतातही कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढती आहे.  कोरोना व्हायरस बरा होण्यासाठी केले जाणारे दावे अधिकच संभ्रमात टाकणारे आहेत. आतापर्यंत तरी भारतात याने कुणाचाही मृत्यू झाला नाही. पण दिल्लीमध्ये एक व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे दिल्लीत भीतीचं वातावरण आहे.  भारतात सध्या काेराेनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. काही सुरक्षा घेतल्यास काेराेनापासून आपला बचाव करता येऊ शकताे. 

भाजपच्या आमदार सुमन हरीप्रिया यांनी सोमवारी दावा केला. त्यानुसार गोमुत्र आणि शेणाचा वापर करून कोरोना व्हायरसचा उपचार केला जाऊ शकतो. आपण जर यज्ञात गुळवेल, तुप आणि यांचा वापर  करून आहूती दिली तर वातावरणातील  कोरोना व्हायरसचे विषाणू पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल. या विधानाबद्दल एक्सपर्टस काय सांगतात.  खरचं कोरोना दूर होऊ शकतो का याबाबत अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत. 

याबाबत डॉक्टर राम आशिष यांनी ओन्ली माय  हेल्थशी बोलताना सांगितले की कोरोना व्हायसरचं अजून कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. अशा  वक्तव्यांमुळे देशातील  लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनद्वारे आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला आहे.  फक्त त्यावरच विश्वास ठेवायला हवा.  या दाव्याबद्दल कोणतंही शास्त्रिय कारणं अजूनही मिळालेलं नाही. ( हे पण वाचा- coronavirus : खरंच मास्कने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...)

ही गोष्ट खरी आहे की कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत असतो. पण या व्हायरसची पसरण्याची गती सुद्धा निश्चित असते.  कोरोना व्हायरस हा एक  मीटरपर्यंत हवेत पसरत असतो. पण कोणतंही सामान किंवा वस्तुला चिकटल्यानंतर अनेक तासांपर्यंत  कोरोनाचे विषाणू  अनेक तासांपर्यंत जिवंत राहत असतात.  त्यासाठी जर तुम्ही आजारी पडत असाल तर मास्क लावणं गरजेचं आहे.  कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे.  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी जवळपासच्या  आरोग्यकेद्रांवर जाऊन डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ( हे पण वाचा- coronavirus : अशी घ्या काेराेनापासून काळजी)

Web Title: Corona virus: How to prevent coronavirus and be safe in india myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.