Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 02:32 PM2020-03-20T14:32:49+5:302020-03-20T14:49:12+5:30

फक्त आहार नाही तर वेगवेगळे व्यायाम करून सुद्धा तुम्ही इन्फेक्शनला स्वतःपासून लांब ठेवू शकता.  

Corona virus : Increase your immunity by doing yogasana myb | Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....

Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....

googlenewsNext

सध्या कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात असताना सगळ्यात महत्वाची आणि मुलभूत अशी गोष्ट आहे ती म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोरोनाच नाही कोणत्याही आजारापासून सुटका मिळवता येऊ शकते. 

केमिकल्स किंवा इतर घटकांचा समावेश न करता घरच्याघरी काही पदार्थांचा समावेश आहारात करून तुम्ही आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. फक्त आहार नाही तर वेगवेगळे व्यायाम करून सुद्धा तुम्ही इन्फेक्शनला स्वतःपासून लांब ठेवू शकता.  चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती आसनं आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता .

भुजंगासन

भुजंगासन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती  चांगली राहिल तसंच  कंबर, पाठ, मान चांगली राहून मासिकपाळी नियमीत राहिल. यासोबतच शरीराची स्ट्रेचिंग सुद्धा होईल.

धनुरासन

धनुरासनामुळे तुमच्या पोटावरची चरबीकमी होण्यासह शरीराचा व्यायाम होईल त्यासाठी तुम्हाला पोटावर झोपून  हा व्यायाम करावा लागेल. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.

बालासन

बालासनाचा तुम्हला गुडघ्यावर वजन  देऊन झोपायचं आहे. दोन्ही हात वर घ्या.  योगासनामुळे  शरीर लवचीक राहतं. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण करून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता. अतिरिक्त चरबी घटण्यास सुरूवात होते. पाठीच्या कण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. 

मत्सयासन 

या योगानसामुळे तुम्हाला तर कंबर दुखण्याच्या त्रास होत असेल तर हा त्रास कमी होतो.  मासपेशी चांगल्या राहतात. गुडघ्यांचे दुखणं सुद्धा कमी होत असतं. 

Web Title: Corona virus : Increase your immunity by doing yogasana myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.