Corona virus : कोणत्या वयाच्या लोकांना बसतो कोरोना व्हायसरचा जास्त फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:28 AM2020-03-06T10:28:26+5:302020-03-06T10:33:36+5:30

या आकड्यांवरून दिसून येतं की तरूणांना सुद्धा या आजाराचा सामना करावा लागत आहे.

corona virus : Know in which age grup corona affected more, how to prevent corona virus precaution | Corona virus : कोणत्या वयाच्या लोकांना बसतो कोरोना व्हायसरचा जास्त फटका

Corona virus : कोणत्या वयाच्या लोकांना बसतो कोरोना व्हायसरचा जास्त फटका

Next

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान आहे. भारतात कोरोना व्हायसरमुळे एकाही व्यक्तीची मृत्यू झाला नसला तरी अनेकांना हा व्हायसर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 3,286 जणांचा मृत्यू झाला असून 95,484 हून अधिक लोकांना त्यांचा संसर्ग झाला आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

अनेक खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला कोण्त्या वयात कोरोना पसरण्याची  शक्यता  जास्त असते. याबाबत सांगणार आहोत. या आकड्यांवरून दिसून येतं की तरूणांना सुद्धा या आजाराचा सामना करावा  लागत आहे. वयवर्ष  २० ते २९ आणि ३० ते ३९ या वयोगटात तरूणांच्या मृत्यूची संख्या  ०.२ टक्के आहे. तेच ७० ते ७९ या वयात  ८ टक्के वयस्कर लोकाचा मृत्यू हा कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. १४.८ टक्के लोक ८० पेक्षा जास्त वयाचे आहेत.

              वयमृत्यू दर 
वयवर्ष ८० पेक्षा जास्त वय-
 
१४. ८ 
७० ते ७९
 
 ८.०
 
६० ते ६९
 
३.६
 
५० ते ५९ 
 
 १.३
 
४० ते ४९
 
०.४
 
३० ते ३९
 
०.२
२० ते २९
 
०.२
१० ते १९
 
०.२
० ते ९ 
 
 ०
 

भारतात मृत्यूचं प्रमाण  कमी

कोरोना व्हायरसचा अत्तापर्यंत  कोणताही उपाय सापडलेला नाही. योग्य काळजी घेणे, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं आणि सावधगिरी बाळगल्याने या आजारापासून सुटका करता य़ेऊ शकते.  भारतात कोरोना व्हायरसने इन्फेक्शन झालेल्या अनेक लोकांची रिकव्हरी जलदगतीने होत आहे. तज्ञांच्यामते खाण्यापिण्याकडे, झोपण्याच्या वेळांकडे तसचं स्वच्छतेकडे पूरेपुर लक्ष दिल्यास या आजारापासून वाचता येऊ शकतं. 

कोरोनाची लक्षणं-

अचानक ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणे, 

शिंका येणे, कफ होणे

अंगदुखी

किडनी आणि लिव्हरसंबंधी आजार

पचनक्रिया  व्यवस्थित नसणे.

अशी घ्या काळजी

निरोगी असाल तर मास्क वापरण्याची गरज नाही. पण जर तुम्ही कोरोनाग्रस्त व्यक्तीची काळजी घेत असाल तर मास्कची गरज आहे. तसेच ज्या लोकांना ताप, कफ, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यांनीही मास्क वापरावा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

शिंकताना किंवा खोकताना, नाक आणि तोंडावर रुमाल अथवा टिश्यू ठेवा. टिश्यूचा वापर करून झाल्यानंतर तो फेकून देता येतो. हात थोड्या थोड्या वेळाने सॅनिटायजरने किंवा साबणाने चांगले स्वच्छ करा. अल्कोहल बेस्ट सॅनिटायजर नेहमी सोबत ठेवा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. हात धुण्यासाठी साबणाचा वापर करा. ( हे पण वाचा-शरीराला एक नाही तर अनेक गंभीर रोगांपासून दूर ठेवेल मिरचीचं पाणी, वाचा कसं...)

एक लहान साबण अथवा पेपर सोप बॅगेत ठेवणं नेहमीच उत्तम आहे.   शरीर चांगलं राहण्यासाठी प्रामुख्याने पाण्याचा वापर केला जातो. आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल ठेवा. म्हणजे प्रवासादरम्यान पिण्यासोबतच हात धुण्यासाठी देखील त्याचा वापर करता येईल. सर्दी, खोकला, ताप असेल त्यांच्याजवळ जाऊ नका. तुमच्यातही अशीच लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. (हे पण वाचा- Corona virus : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आधी रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कशी ते जाणून घ्या)

Web Title: corona virus : Know in which age grup corona affected more, how to prevent corona virus precaution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.