Corona virus : मास्क आणि सॅनिटायजरपेक्षा लिंबाच्या वापराने कोरोनाला ठेवता येईल लांब...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:57 PM2020-03-20T15:57:13+5:302020-03-20T16:13:36+5:30
तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त मास्क आणि सॅनिटायजर नाही तर लिंबाचा वापर करून सुद्धा तुम्ही आजारांना लांब ठेवू शकता.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे लोक घाबरलेले आहेत. कधीही कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती लोकांना वाटत आहे. कोरोनाला घाबरण्यापेक्षा कोरोनाचा सामना करणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त मास्क आणि सॅनिटायजर नाही तर लिंबाचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवू शकता. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.
माजी राष्ट्रपतींचे चिकित्सक आणि देशातील प्रसिद्ध डॉक्टर मोहसिन वली यांनी, हात धुण्यासाठी लिंबूचा वापर केल्यास व्हायरस जवळही फिरकत नसल्याचं सांगितल आहे. भारतात हात धुण्यासाठी अनेक काळापासून लिंबूचा वापर केला जात आहे. डॉ. वली यांनी सांगितलं की, हात धुण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर केल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.
अनेक ठिकाणी सॅनिटायजरर्स पुरवली जाऊ शकत नाही. काही कारणांमुळे या गोष्टींच्या वापरापासून लोक वंचीत राहतात. अशावेळी लिंबाचा वापर करून हात धुतल्यास किटाणू नष्ट होण्यास मदत होईल.२०१७ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, बॅक्टेरिया मारण्यासाठी लिंबू अतिशय प्रभावशाली आहे. ( हे पण वाचा- इम्यूनिटी वाढवण्यासाठी 'हे' दोन खास ज्यूस ठरतात रामबाण उपाय, आसपासही भटकणार नाही आजारं!)
रिसर्चकर्त्यांनी सांगितलं की, कोणत्याही संसर्गावेळी सॅनिटायझर किंवा साबण मिळत नसल्यास लिंबू रसाने हात धुवून आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. 'द जनरल ऑफ फंक्शनल फूड्स' मध्ये दिलेल्या माहितीनुसार, E. coli ई-कोलाईसारख्या महामारीशी लढण्यासाठी लिंबू प्रभावी ठरला होता. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हात साफ करण्यासाठी सर्वात आधी लिंबाचा रस हातावर घ्या. रस दोन्ही हातांवर पसरवून हात स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन्ही हात धुवा. ( हे पण वाचा-Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....)