Coronavirus : कोरोनाच्या 'या' गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास असू शकतो जीवाला धोका, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:45 AM2020-03-24T09:45:55+5:302020-03-24T10:22:20+5:30
तुम्हाला तोंडाची चव कळत नसेल किंवा पोटात दुखत असेल तर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. सर्वसाधारणपणे कोरोना व्हायरसची लक्षणं श्वास घ्यायला त्रास होणं, ताप येणं, सर्दी होणं ही आहेत. पण काहीही खात असताना तुम्हाला पदार्थाची चव कळत नसेल किंवा पोटात दुखत असेल तर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं सुद्धा कोरोना व्हायरसची असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या लक्षणांबद्दल.
पोटात दुखणं सुद्धा असू शकतं कोरोनाचं लक्षणं
अमेरिकेतील रिसर्चकर्त्यांच्या सल्ल्यानुसार पोटदुखी, शरीरातील उच्च तापमान म्हणजेच ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं, या समस्या उद्भवतात. कोरोना व्हायरसच्या रुग्णांना सुद्धा पोटात दुखण्याची आणि पचनाची समस्या उद्भवत असते.
या अभ्यासानुसार चीनच्या हुबेई प्रांतात २०४ कोरोना व्हायरस रुग्णांच्या डेटावर आधारीत संशोधन करण्यात आलं होतं. त्यात ४८.५ टक्के लोकांना उलटी, पोटदुखी, श्वसनाच्या समस्या ही लक्षणं सुरूवातीला दिसून आली होती. यानुसार पचनाचे आजार उद्भवत असलेल्यांचा समावेश कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये अधिक होता.
चव न समजणे आणि नाकाला संवेदना न होणे हे कोरोना व्हायरसचे लक्षण आहे.
अचानक तोंडाला चव न समजणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे हे एनोस्मिया किंवा हाइपोस्मिया म्हणून कोरोनाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. दक्षिण कोरिया, चीन आणि इटली यांच्या आकड्यांवरून असं दिसून आलं की कोरोना रुग्णांमध्ये कोणतेही खास लक्षणं दिसत नव्हती. फक्त कसलाही वास नाकाला न जाणवणं आणि चव नसणं ही प्रमुख लक्षणं कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे दिसून येत होती. ( हे पण वाचा- Corona virus : कोरोनाला मात दिलेल्या रूग्णांच्या शरीरातून तयार केलं जाईल औषध, जपानच्या कंंपनीचा दावा!)
या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं कोरोना व्हायरसच्या पसरण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. ईराणने एनोस्मिया किंवा हाइपोस्मिया या प्रकारात झपाट्याने वाढ होत असल्याची सुचना सुद्धा दिली आहे. अशा लक्षणांकडे लक्ष न देणं जगातील अनेक देशांना कोरोनाच्या जाळ्यात अडकवू शकतं. ( हे पण वाचा-सर्दी खोकल्याच्या औषधांची साठवणूक ?, पॅरासिटामोलला प्रचंड मागणी)