तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:34 PM2020-06-11T17:34:44+5:302020-06-11T17:42:34+5:30
काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या जीवघेण्या आजारापासून दूर राहू शकता.
वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप येणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण सध्या कोरोनाच्या माहामारीचा कहर सुरू असल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची सुद्धा भीती वाटत आहे. तुम्हालाही वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं दिसून आल्यास घाबरण्यासारखे काहीही नाही. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता.
सतत हात धुणं
कोरोना व्हायरसपासून बचावासासाठी हात धुणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. WHO तील तज्ज्ञांनी सुद्धा अनेकदा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी २० सेकंदांपर्यंत हात धुण्याचा सल्ला दिला आहे. सॅनिटायजरच्या वापरापेक्षा तुमच्याकडे पाणी आणि साबण उपलब्ध असेल तर हात धुत राहा.
तोंडाला सतत हात लावू नका.
कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनपासून लांब राहायचं असेल तर सतत तोंडाला हात लावू नका. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही तोंडाला स्पर्श केला तर व्हायरसचा प्रवेश शरीरात होऊ शकतो. त्यासाठी डोळे, नाक, ओठांना स्पर्श करणं टाळा.
सार्वजनिक स्थळांवर लिफ्टचं बटन हाताने दाबू नका
कोरोनापासून बचावासाठी हा उपाय प्रभावी आहे. लिफ्टचं बटन आणि सार्वजनिक स्थळांवर असलेले दरवाजे आणि स्वच्छतागृह या ठिकाणांमुळे संक्रमण पसरू शकतं. त्यामुळे कोपराने बटण दाबण्याचा किंवा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करा.
प्रवास करताना सावध राहा
प्रवास करत असताना सावध राहायला हवं कारण तुमच्यामागे किंवा पुढे बसलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असू शकते. त्यामुळे मास्कने चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. शिंकत असलेल्या किंवा खोकत असलेल्या व्यक्तीपासून लांब राहा.
एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर दुरूनच बोला
सध्याच्या स्थितीत शक्यतो एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आलिंगन किंवा हात मिळवू नका. कारण तुमची एक चूक संक्रमण पसरण्याचं कारण ठरू शकते. म्हणून लांबूनच संपर्क साधा.
शिंकण्याचं हे नवं तंत्र शिकावंच लागेल भाऊ... कारण आपल्याला रोगाशी लढायचंय!
व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय