Omicron: चिंतावाढली! ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागावर करतोय अॅटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:07 PM2022-01-22T15:07:58+5:302022-01-22T15:08:41+5:30
Omicron व्हेरिअंट शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, डोके, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होत आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची विविध लक्षणे समोर येत आहेत. सध्या तर कोरोनाची लक्षणे आणि सामान्य फ्लूची लक्षणे यातील फरक समजणेही कठीन झाले आहे. यातच आता ब्रिटनने तयार केलेल्या ओमायक्रॉनच्या 20 लक्षणांच्या यादी एक पूर्णपणे नवे लक्षण समोर आले आहे. या लक्षणामुळे ओमायक्रॉनची ओळख पटू शकते.
Omicron व्हेरिअंट शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, डोके, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होत आहे. या नव्या प्रकारामुळे कान दुखणे, मुंग्या येणे, बेल वाजणे अथवा शिट्टी वाजल्या यासारख्या समस्या उद्भवत आहेत. विशेषत: संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये हे लक्षण दिसून येते. व्हेरिअंटमुळे प्रभावित झालेल्या लोकांनाही थंडी वाजण्या सारखे लक्षण जाणवत आहेत. अशा स्थितीत वेळीच उपचार घेतल्यास ही समस्या बर्याच अंशी बरी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी कोरोनाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कानांचे परीक्षण केले. व्हायरस सिस्टिमवर कशा प्रकारे प्रभाव टाकतो, हे पाहणे यामागचा उद्देश होता. यात रुग्णांना कान दुखी आणि मुग्यांसारखी समस्या जाणवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कदाचित हे कोरोनाचे लक्षण आहे, हे लोकांना माहीतच नाही.
डॉ. कॉन्स्टेंटिना स्टॅनकोविक यांनी म्हटले आहे, की जर तुम्हाला ऐकण्याची, कानात आवाज येण्याची किंवा चक्कर येण्याची समस्या जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत त्वरित कोविड चाचणी करा. तसेच, अनेक रुग्णांमध्ये आम्हाला केवळ हियरिंग लॉसच दिसून आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय, ZOE कोविड लक्षण अध्ययनाचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी सन ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, हा प्रकार नाकाऐवजी तुमच्या आतड्यांतही लपलेला असू शकतो. याचा अर्थ असा की, जेव्हा लोकांना संसर्ग होतो आणि पोट खराब झाल्यासारखी लक्षणे जाणवतात, तेव्हा त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्हही येऊ शकते. कारण नाक अथवा तोंडात ओमायक्रॉन मिळत नाही. ते म्हणाले, हा विषाणू शरीराच्या वेगवेगळ्या भागांत आढळू शकतो, हे आम्हाला माहीत आहे. यामुळे तो आतड्यांवरही हल्ला करू शकतो.