Corona Virus: पोस्टाच्या पत्रांमुळे चीनमध्ये कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लाट, CDC तील तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 05:55 PM2022-03-18T17:55:10+5:302022-03-18T17:59:56+5:30
चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात आलाय.
चीन (China), हाँगकाँगमध्ये (Hongkong) कोरोनाचा (Corona) फैलाव वाढत असताना एक नवी धक्कादायक माहिती समोर आलीये. कोरोनाची ताजी लाट ही पोस्टातून आलेल्या पत्रांमुळे पसरल्याचं एका अभ्यासात म्हटलंय. चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात आलाय.
चीनमध्ये पोस्टाच्या पत्रांमधून पसरला कोरोना ?
जानेवारीमध्ये पत्रांच्या पाकिटांवर ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) अंश आढळून आलेत. चीनमध्ये त्यापूर्वी सापडलेल्या व्हेरियंटपेक्षा तो वेगळा होता. 15 जानेवारीला बीजिंगच्या हैदियान जिल्ह्यात एका २६ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. तिच्यामध्ये हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला. पुढल्या आठवड्याभरातच तिच्या संपर्कात आलेल्या आणखी ५ जणांना या व्हेरियंटची लागण झाली. बीजिंगमध्ये एका जागी एवढ्या केसेस सापडण्याची ही पहिलीच वेळ होती. महिलेला हे संक्रमण पोस्टातून आलेल्या पत्रामुळे झाल्याचं CDCचं म्हणणं आहे.
मात्र तज्ज्ञांनी हा दावा अर्धसत्य असल्याचं म्हटलंय. पत्रांमुळे ओमायक्रॉनच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नसली, तरी हवेतून होणारं संक्रमण हेच कोरोनाच्या फैलावाचं मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पत्र किंवा अन्य माध्यमातून कोरोना पसरत असल्याचे असे अहवाल येत असतात. मात्र चीनमध्ये आलेला कोरोना जगभरात पसरायला वेळ लागत नाही हे सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे चौथी लाट टाळायची असेल नियमांचं पालन करा .