Omicron Variant : ओमायक्रॉन बाधितांना श्वासाचा किती त्रास होतो? मृत्यूचा धोका किती? खुद्द द.आफ्रिकेतील डॉक्टरांनीच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:20 PM2021-12-08T13:20:50+5:302021-12-08T13:20:54+5:30
प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत.
कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांत झपाट्याने वाढत होत आहे. यातच, दक्षिण आफ्रिकेच्या ओमायक्रॉन एपिसेंटरमधील एका मोठ्या रुग्णालयातील प्राथमिक आकडेवारीनुसार, असे दिसून येते, की येथील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, रुग्णांना क्वचितच गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासत आहे.
प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. सक्षिण आफ्रिकन मेडिकल रिसर्च काउंसिल आणि स्टिव्ह बायको रुग्णालयात इंफेक्शिअस डिसीज डॉक्टर फरीद अब्दुल्लाह यांनी या रुग्णांत दिसून येणारी लक्षणे आणि त्यांची स्थिती बारकाईने अभ्यासली आहे. तसे, एपिसेंटरमध्ये साधारणपणे बहुतांश नवे रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिअंट प्रभावित आहेत, अशी पुष्टी नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्यूनिकेबल डिसीजने केली होती.
रुग्णांतील लक्षणे आणि त्यांची प्रकृती -
अहवालानुसार, कोरोना वॉर्डमध्ये दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांना पूर्वी प्रमाणे ऑक्सिजनची गरज भासली नाही. 2 डिसेंबर रोजी एकूण 38 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. या 38 प्रौढांपैकी, 6 जणांचे लसीकरण झाले होते. तर 24 जणांचे लसीकरण झालेले नव्हते आणि 8 लोक होते ज्यांच्या लसीकरणासंदर्भात माहिती मिळाली नाही. पूर्णपणे लसीकरण झाले केवळ एका व्यक्तीलाच ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र, फुफ्फुसात पल्मोनरी डिसीज झालेला असल्याने उपचाराची गरज भासली. या दोन आठवड्यांत केवळ दोनच लोकांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज पडली.
कोरोना वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांत जवळपास 19 टक्के रुग्ण 9 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुले होती. तर 28 टक्के रुग्णांचे वय 30 ते 39 वर्षांच्या आत होते. कोरोना वॉर्डच्या अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यांत येथे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तसेच, गेल्या 18 महिन्यांतील एकूण मृत्यूंमध्ये मुलांचे प्रमाण 17 टक्के एवढे आहे. येथे आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याचे कारण ओमायक्रॉन नसल्याचे मानले जाते. मृतांचा आकडाही वाढू शकतो. येत्या दोन आठवड्यांत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. भविष्यातील परिस्थिती कशी असेल, हे समजण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. गेल्या, 18 महिन्यांत कोरोना वॉर्डमध्ये अॅडमिट रहण्याचे प्रमाण साधारणपणे 2.8 ते 8.5 दिवस एवढे होते.