बापरे! कोरोनातून बरं झालेल्या लोकांसाठी धडकी भरवणारी माहिती; इम्युनिटी होतेय कमी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:17 AM2024-07-19T11:17:23+5:302024-07-19T11:23:36+5:30

Corona Virus: सर्वच देशांनी कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला होता. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही लोक या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. अशातच पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 

Corona Virus Patient after recovery body formed autoantibody they have weakening immunity | बापरे! कोरोनातून बरं झालेल्या लोकांसाठी धडकी भरवणारी माहिती; इम्युनिटी होतेय कमी, कारण...

बापरे! कोरोनातून बरं झालेल्या लोकांसाठी धडकी भरवणारी माहिती; इम्युनिटी होतेय कमी, कारण...

कोरोना व्हायरसने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलं आहे. सर्वच देशांनी कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला होता. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही लोक या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. अशातच पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 

नुकत्याच झालेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी केवळ दोन टक्के रुग्णांमध्ये कोरोनामधून बरं झाल्यानंतरही ऑटोअँटीबॉडीज विकसित झाली आहे. ही ऑटोअँटीबॉडी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.

ऑटोअँटीबॉडी हे शरीरातील असे घटक आहेत जे शरीरालाच हानी पोहोचवू लागतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये ऑटोअँटीबॉडीज टिकून शकतात. यामुळे इम्युनिटी कमी होत आहे. 

ऑटोअँटीबॉडीजमुळे स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतरही तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल, तर पुन्हा एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

या संशोधनात ९ लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी ५ लोक असे होते ज्याच्यामध्ये ऑटोअँटीबॉडीज ७ महिन्यांपर्यंत दिसल्या. पण याला निश्चितच कायमस्वरूपी समस्या म्हणता येणार नाही. शरीरात तयार झालेल्या अशा ऑटोअँटीबॉडीज लाँग कोविडची लक्षणे आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या संशोधनात सहभागी ५२ लोकांपैकी ७० टक्के लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं अभ्यासात म्हटलं आहे. शरीरात आढळणाऱ्या ऑटोअँटीबॉडीजमुळे खूप नुकसान होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आरोग्यविषक समस्या असल्याच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Read in English

Web Title: Corona Virus Patient after recovery body formed autoantibody they have weakening immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.