Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:13 AM2021-06-07T06:13:38+5:302021-06-07T06:14:08+5:30

Corona Virus : भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक असून, त्याचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता.

Corona Virus : The second variant found in India is dangerous, the possibility of weight loss in seven days if interrupted | Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता

Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू सातत्याने आपले रूप बदलून अधिकाधिक धोकादायक होत चालला आहे. या विषाणूचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. भारतात कोरोना विषाणूच्या एका व्हेरिएंटने आधीच धुमाकूळ घातला असताना आता देशात या विषाणूचा अजून एक व्हेरिएंट सापडला आहे. 

भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक असून, त्याचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. तेथून तो भारतात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला गेला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमधून कोरोना विषाणूचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. त्यातील दुसऱ्या व्हेरिएंटचे नाव बी.१.१.२८.२ आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार तज्ज्ञांनी या व्हेरिएंटची चाचणी एका उंदरावर केली. त्याचे परिणाम धक्कादायक होते. तज्ज्ञांना या संशोधनात दिसले की, संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आत याची ओळख पटवता येऊ शकते. हा व्हेरिएंट रुग्णाचे वजन सात दिवसांत घटवू शकतो. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच हा विषाणूसुद्धा अँटीबॉडी कमी करू शकतो. 
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) तज्ज्ञांनी सांगितले की, बी.१.१.२८२ व्हेरिएंट परदेशातून आलेल्या दोन जणांत आढळला होता. या व्हेरिएंटची जिनोम सिक्वेंसिंग आणि परीक्षण करण्यात आले आहे. सध्या भारतात याचे अधिक रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र, डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक सापडला आहे. 

तीन उंदरांचा मृत्यू संसर्गामुळे

- परदेशातून आलेल्या दोन जणांची सॅम्पल सिक्वेंसिंग करण्यात आली होती. कोरोनामधून बरे होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणे दिसत नव्हती. 

- मात्र, याची सॅम्पल सिक्वेंसिंग केल्यानंतर बी. १.१.२८.२ व्हेरिएंटी माहिती मिळाली तेव्हा त्याची नऊ सिरीयन हेमस्टर उंदरांवर चाचणी घेण्यात आली. 

- यातील तीन उंदरांचा मृत्यू हा शरीरातील अंतर्गत भागात संसर्ग वाढल्याने झाला.

Web Title: Corona Virus : The second variant found in India is dangerous, the possibility of weight loss in seven days if interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.