Corona virus : उन्हात बसून कोरोनापासून लांब राहता येतं? जाणून घ्या एक्सपर्ट्सचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:01 AM2020-03-22T10:01:46+5:302020-03-22T10:04:34+5:30
उन्हात बसल्यामुळे शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून निघते. पण उन्हामुळे कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल असं समजणं कितपत योग्य आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण तयार झालं आहे. विविध स्तरातुन कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. काहींच्यामते रोज सुर्यप्रकाशात बसल्यामुळे व्हिटामीन डी मिळतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे व्हायरस नष्ट होतो. आज आम्ही तुम्हाला यात कितपत तथ्य आहे याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक्सपर्ट्सचं म्हणणं काय आहे याबाबत माहिती मिळेल.
माध्यमांशी बोलताना तज्ञांनी सांगितलं की या विषयावर रिसर्च करण्यात आला आहे. उन्हामुळे व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कराण उन्हात बसल्यामुळे शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून निघते. पण उन्हामुळे कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल असं समजणं योग्य ठरणार नाही.
सध्याच्या परिस्थीतीत लोकांना घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. जे लोक घरी आहेत त्यांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. अशावेळी तुम्ही सकाळच्यावेळी घराच्या छतावर जाऊन काही वेळ व्यायाम करू शकता. तसंच कोवळं ऊन अंगावर घेऊन अनेक आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर सतत घरी बसून कंटाळा येत असेल तर आजूबाजूच्या लोकांशी बोलून किंवा त्याच्यासोबत व्यायाम करून तुम्ही वेळ काढू शकता. पण हे करत असताना तुम्हाला स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. सतत हात धुणं, सॅनिटायजरचा वापर करणं, गरजेचं आहे.
सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात आणि आपली संख्या वाढवतात. असा अनेकांचा समज आहे.
रिसर्च
नॅशनल जियोग्राफिकच्या माहितीनुसार ऊन्हातील अल्ट्रावॉयलेट किरणांमुळे कोणत्याही प्रकारच्या व्हायरसवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण उन्हामुळे कोरोना व्हायरस नष्ट न होता त्याचे स्वरूप बदलण्याची सुद्धा शक्यता आहे.