लॉकडाऊनमध्ये तुम्हालासुद्धा उद्भवतेय 'ही' गंंभीर समस्या? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:30 PM2020-04-14T13:30:13+5:302020-04-14T13:41:52+5:30

लॉकडाऊनने लोकांना कमीतकमी वस्तूंसह कसं जीवन जगता येईल. याबाबत शिकवलं आहे.

Corona Virus spread and lockdown loss of appetite reasons and cure myb | लॉकडाऊनमध्ये तुम्हालासुद्धा उद्भवतेय 'ही' गंंभीर समस्या? जाणून घ्या कारणं आणि उपाय

लॉकडाऊनमध्ये तुम्हालासुद्धा उद्भवतेय 'ही' गंंभीर समस्या? जाणून घ्या कारणं आणि उपाय

Next

कोरोना व्हायरसपासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा. यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या आधी कधीही न झालेल्या लॉकडाऊनने लोकांना कमीतकमी वस्तूंसह कसं जीवन जगता येईल. याबाबत शिकवलं आहे. लोकांचं राहणीमान पूर्णपणे बदललं आहे. तसंच साध्या पद्धतीचं जेवण तयार करण्याकडे जास्त कल आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना भूक न लागण्याची समस्या उद्भवत आहे. आज आम्ही तुम्हाला ही समस्या निर्माण का होते. तसंच यावरचे उपाय सांगणार आहोत.
 

मानसिक तणाव

काही इमोशनल कारणांमुळे सध्या भूक कमी लागते.  ताण, तणाव, एंक्जायटी, यांमुळे भूक कमी लागते. याशिवाय लोक कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार आणि लॉकडाऊनमुळे खूप चिंतेत आहेत. म्हणून भूक लागण्याचं कमी झालं आहे.

शारीरिक हालचाल

२००४ मध्ये  द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशियनमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधानुसार शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे लोकांना भूक न लागण्याची समस्या निर्माण होते. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं बंद आहे. अनेकजण जीमला सुद्ध जात नाहीत परिणामी हालचाल न झाल्यामुळे भूक लागत नाही.

वातावरणात झालेले बदल

सध्या गरमीचे वातावरण सुरू झाल्यामुळे खूप घाम येतो. शरीरातील उष्णता वाढते. शरीरातील पाण्याचं प्रमाण या दिवसात कमी होत जातं. त्यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स घ्रेलिन हार्मोन्स कमी होतात. शरीराचं तापमान वाढल्याने भूक कमी लागते.

भूक न लागण्याच्या समस्येवर उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या

जास्तीत जास्त पाणी प्यायल्यामुळे भूक व्यवस्थित लागते. कारण शरीर डायड्रेट होत असतं.   त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान स्वतःचं शरीर चांगलं ठेवण्यासाठी सूप, लिंबू पाणी, ग्रीन टी चा आहारात समावेश करा.

इच्छा असेल तरच जेवा

एक्सपर्ट्सच्यामते  गरमीच्या वातावरणात भूक नसेल ततरी तुम्ही खाल्लं तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आंबट ढेकर येणं, अजीर्ण अशा समस्या उद्भवतात.  म्हणून उन्हाळ्यात जेवणाच्या वेळेला दोन घास कमी खाल्ले तरंच शरीर निरोगी राहील.

व्यायाम किंवा योगासनं करा

लॉकडाऊनमध्ये भूक न लागण्याची समस्या उद्भवते.  म्हणून घरच्याघरी १० ते १५ मिनिट वेळ काढून व्यायम करा. शरीर एक्टिव्ह ठेवा.  शारीरिक हालचाल झाल्यास भूक चांगली लागेल.  रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासह आजारांपासून सुद्धा व्यायामामुळे तुम्ही लांब राहू शकता.

Web Title: Corona Virus spread and lockdown loss of appetite reasons and cure myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.