धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 09:43 AM2020-08-02T09:43:20+5:302020-08-02T09:45:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना विषाणूंबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ३ फुटांच्या अंतरावरून कोरोना विषाणू पसरू शकतो.

Corona virus spreading speed is high in small houses and flats know the reason | धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

Next

रेडिओच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आयएमएचे माजी महासचिव डॉ. नरेंद्र सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या घरांमध्ये पुरेसं व्हेंटिलेशन नसतं. म्हणजेच पुरेश्या प्रमाणात हवा खेळती राहत नाही. त्या ठिकाणी कोरोना विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो. याबाबत अमेरिकेच्या मिनिसोटा युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांकडून माहिती प्राप्त झाली आहे.  संशोधकांनी शाळा, घरं, शॉपिंग मॉल्समधील कोरोना संक्रमित ड्रॉपलेट्सच्या आधारावर परिक्षण केले होते. दरम्यान या संशोधनातून दिसून आलं की बंद ठिकाणी किंवा हवा खेळती नसलेल्या ठिकाणी कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात एक्टिव्ह राहतो. ड्रॉपलेट्स वेगवेगळ्या ठिकाणी चिकटलेले असतात.

सध्याच्या काळात फक्त शहरांमध्ये नाही तर गावांमध्येही कमी जागेत अनेक घरं उभारली जातात. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने जागेची कमतरता भासत आहे. आरोग्य तंज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान घरांमध्ये राहणं प्रकृतीसाठी योग्य नाही.  गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या माहामारीत कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना विषाणूंबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ३ फुटांच्या अंतरावरून कोरोना विषाणू पसरू शकतो. हवेतून होत असलेल्या कोरोना संसर्गाबाबत अनेक तज्ज्ञ ठाम असून त्यांनी आपली भूमिका जागतिक आरोग्य संघटनेकडे स्पष्ट केली. एखाद्या  संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून बाहेर येणारे ड्रॉपलेट्स किती दूरपर्यंत पोहोचतील हे त्या ठिकाणच्या जागेवर आणि वातावरणावर अवलंबून असतं. 

लहान तसंच कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. बदलत्या काळात कमी जागेत जास्तीत जास्त फ्लॅट्स तयार केले जात आहेत. त्यामुळे घरातील हवा खेळती राहत नाही. तुलनेने मोठ्या घरांमध्ये हवा खेळती राहते.  त्यामुळे व्हायरसच्या संक्रमणाचा धोका कमी असतो. लहान घरांमध्ये व्हेंटिलेशन नसल्याकारणाने  जलद गतीने संक्रमण पसरण्याचा धोका असतो. अनेक ऑफिसेस आणि घरांमध्ये एसीचा वापर केला जातो. त्यावेळी दरवाजे आणि खिडक्या बंद असतात. अशा वातावरणात संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे निरोगी व्यक्तीपर्यंत संक्रमण पोहोचण्याचा धोका जास्त असतो. 

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: Corona virus spreading speed is high in small houses and flats know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.